RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

फलटण : अवैद्य खासगी सावकारी प्रकरणी सोमवार पेठेतील दोघांवर गुन्हा

25 August 2018 at 23:31

फलटण : जिल्ह्यातील अवैद्य खासगी सावकारीचा 'गड' समजल्या जाणाऱ्या फलटणमध्ये आज शहरातील सोमवार पेठेतील दोघा अवैद्य खासगी सावकारांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवाजी सुभाष भापकर (वय ४५) रा. धूळदेव ता. फलटण यांनी अवैद्य खासगी सावकार संतोष नरसिंग पवार, उमेश नरसिंग पवार रा. सोमवार पेठ, फलटण यांचेकडून ऑगस्ट २०१४ ते डिसेंबर २०१७ पर्यंत वेळोवेळी साडेसहा लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. व्याजापोटी भापकर अवैद्य खासगी सावकार पवार बंधूंना दरमहा ६५ हजार रुपये देत होते. तसेच भापकर यांची ट्रॅक्टर-ट्रॉली खासगी सावकार पवार बंधूंनी तारण ठेवली होती. भापकर यांनी ऑगस्ट २०१४ ते डिसेंबर २०१७ पर्यंत व्याजापोटी पवार यांना ४८ लाख रुपये परत दिले होते. तरीही संतोष पवार व उमेश पवार, भापकर यांना पैशासाठी दमदाटी करीत होते. दरम्यान भापकर घरी नसताना अवैद्य खासगी सावकार पवार बंधूंनी भापकर यांच्या धूळदेव येथील घरी जावून आई व वडिलांना तुमच्या मुलाने आमचे व्याजाचे पैसे दिले नाही, त्याला सोडणार नाही त्याला जीवे मारणार आहे. अशी धमकी व शिवीगाळ केली होती. अखेर शिवाजी भापकर यांनी सोमवार पेठेतील अवैद्य खासगी सावकार संतोष व उमेश पवार यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आज दि. २५ रोजी दोघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्यानुसार फलटण शहर पोलिस ठाण्यात दोघां सावकारांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक तपास सपोनि. शिंगटे करीत आहेत 


Ranjeet dhembare

पोलिस दादा चांगलं काम karat आहेत news wale pan छान kaam karat aheat अजून एक tumala सांणगयच aahe mala pan complit दयाचे आहे mala help kara


जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before