RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

श्री. छ. उदयनराजेंना संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या : राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले

14 April 2019 at 01:40

सातारा : सलग तिसऱ्यांदा संसदेत जाण्यासाठी सिद्ध झालेल्या खा. श्री. छ. उदयनराजेंना संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी केले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस, व, मित्रपक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ खटाव तालुक्यात वर्धनगड,  नागनाथवाडी, पुसेगाव, खटाव, ललगुण, राजापूर, फडतरेवाडी येथे झालेल्या प्रचार सभांमध्ये त्या मतदारांशी संवाद साधत होत्या. या प्रचार दौऱ्यात वडुजचे नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मानाजीकाका भोसले, विठ्ठलराव फडतरे, मोहनराव जाधव,  नवनाथ फडतरे, कैलासराव घाडगे, बाळासाहेब इंगळे,  काका धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवछत्रपतींचे थेट वारस असलेल्या उदयनराजेंकडे जनता मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आजवर त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकीमधून विकासकामांचा झंजावात निर्माण केला आहे. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी आपुलकी, जिव्हाळा जपला आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी जनतेत नेहमीच आदरभाव व्यक्त होत असतो. आजवर सलग दोनदा  संसद  सदस्य म्हणून त्यांना मतदारराजाने निवडून दिले आहे. यावेळीही मोठ्या मताधिक्याने त्यांना पुन्हा संसदेत पाठवा. दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविणारे झुंजार नेतृत्व म्हणून त्यांना खटावमधील जनतेने आग्रहाने मतदान करावे, असेही राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यावेळी म्हणाल्या.

वर्धनगड, ललगुण, राजापूर, खटाव, पुसेगाव आदी सर्वच गावांमध्ये त्यांचे ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे स्वागत केले व महाराजसाहेबांना या निवडणुकीत उल्लेखनीय मते देऊन संसदेत पाठवू व रयतेच्या राजाप्रति आदर व्यक्त करू, असे सांगितले.  या दौऱ्यात झालेल्या जाहीर सभांना आणि प्रचारफेऱ्यांमध्ये शालिनीताई घोरपडे, गीतांजली कदम,  अश्विनी गुरव, राजेंद्र घाडगे, हुसेनभाई शिकलगार, योगेश लवंड, दीपक शिरतोडे, जयवंत गोसावी, वसंत पवार, जयवंत पवार, मनोज देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मानाजी काका घाडगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महेश गुरव यांनी सूत्रसंचालन व मोहनराव जाधव यांनी आभार मानले.

धोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा

धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह

10 hours before

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे

10 hours before

मर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर

मर्सिडिज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील आपले विश्वासार्ह भागीदार बी.यू. भंडारी मोटर्स यांच्या साह्याने आपल्या मसर्विस ऑन व्हील्सफ या नाविन्यपूर्ण ग्राहक सेवेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ केला.

10 hours before

राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

टेंभुच्या पाण्याचा बुडबुडाही माणपर्यंत येऊ शकणार नाही म्हणणा-यांना आम्ही टेंभूचे पाणी माण तालुक्यात आणून दाखवले आहे. आता उत्तर माणला जिहे - कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावांना पाणी मिळण्यासाठी

10 hours before