01:27am | Jul 28, 2018 |
कराड : मलकापूरला नगरपालिकेचा दर्जा मिळवा यासाठी सत्ताधाऱ्यांचाच विरोध होता. आपल्याच कारकीर्दीत नगरपंचायतीची पालिका व्हावी, याकरिता त्यांनी केवीलवाना प्रयत्न केला आहे. अर्धवट प्रस्ताव देऊन प्रस्ताव लटकवत ठेवला, उपोषण केले आणि उच्च न्यायालयात जाऊन चार महिने मुदतवाढीसाठी सत्ताधाऱ्यांची धडपड मलकापूरने पाहिली आहे. सत्ताधाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव पाठविला असतातर दोन महिन्यापूर्वी मलकापूरला 'क' वर्ग पालिकेचा दर्जा मिळाला असता असा घनाघात कृषीमित्र अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अतूल भोसले यांनी गेल्या तीन वर्षात केलेला पाठपुरावा, दि. २४ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांची समक्ष भेट घेऊन केलेली फेर विनंती आणि या विनंतीला मुख्यमंत्र्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे नगरपालिकेच्या अनुषंगाने न्यायालयीन स्तरावर योग्य ती पुर्तता केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मलकापूर नगरपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर होणार असल्याचे अशोकराव थोरात यांनी सांगितले.
मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिका मुख्यमंत्री व नगरविकास खात्याचा हिरवा खंदील मिळाली असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलकापूर नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, सागर निकम, सुर्यकांत खिलारे, सुरज शेवाळे, शंकरराव साळुंखे, भारत जंत्रे, शशीकुमार शिंदे, अरूण यादव आदींची उपस्थित होते.
अशोकराव थोरात म्हणाले, मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी म्हणून गेल्या तीन वर्षापासून भाजपचे प्रदेश सरचिटणीस व विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतूल भोसले यांनी पाठपुरावा केला आहे. मंगळवार दि. २४ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांची मुंबई येथे भेट घेऊन मलकापूरला नगरपालिका का असावी, येथील नागरिकांना त्याचा काय फायदा होणार आहे. शिवाय विकासाला कशा पध्दतीने गती मिळणार आदी मुद्यावर २० मिनिटे सविस्तर चर्चा केली आहे. मलकापूरला तातडीने नगरपालिकेचा दर्जा देण्यासाठीचे शिफारस पत्र डॉ. भोसले यांनी दिले आहे. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्च न्यायालयात पालिकेच्या अनुषंगाने योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासकीय पातळीवर मलकापूरला 'क' वर्ग नगरपालिका देण्याबाबतची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे मलकापूरचा सर्वांगिण विकासासाठी डॉ. भोसले यांनी पुढाकार घेऊन विकासाचा आराखडा तयार करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी डॉ. भोसले यांना दिल्या आहेत. दि. २९ मे २०१८ रोजी मलकापूर येथे दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असून येत्या दोन ते तीन दिवसात अधिकृतपणे मलकापूरला नगरपालिकेचा दर्जा दिल्याची घोषणा केली जाणार असल्याचे अशोकराव थोरात यांनी सांगितले.
डायरेक्शन देणारे मनोहर शिंदे?
पालिका झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचे काय? आरक्षण बदलल्यास आपण ओबीसी प्रवर्गातील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणार का? या प्रश्नावर बोलताना अशोकराव थोरात म्हणाले, पालिकेचा दर्जा मिळाल्यांनतर निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे येथील आरक्षण व प्रभाग रचना होणार आहे. त्यामुळे आयोगाचा आदेश अंतिम असेल. आम्ही लोकशाही मानतो हूकूमशाही नाही. त्यामुळे निवडणूक आयोग व न्यायालयाला डायरेक्शन देत नाही. आणि अशा पध्दतीने आयोग व न्यायालयाला डायरेक्शन देणारे मनोहर शिंदे कोण? असे सांगत मला मनोहर शिंदे बनवायचा आपला विचार आहे की काय? असा टोलाही अशोकराव थोरात यांनी लगावला. मात्र ओबीसी प्रवर्गातील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणार का? या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.
बाबांच्या डोक्यात काय होते?
नगरपालिकेला डॉ. भोसले व आमच्या कधीही विरोध नव्हता. मुळात आ. पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या मंत्री मंडळाला या निर्णयापयंर्त पोहोचण्यासाठी २०१४ साल उजाडले. त्यांनतर जे ठराव केले, जो प्रस्ताव केला तो ही चुकीच्या पध्दतीने करण्यात आला. आ. चव्हाण यांनी त्यांची शिफारस १७ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर अधिवेशनात दिली. मग त्यांना शिफारस देण्यासाठी ऐवढा वेळ का वेळ झाला आणि त्यांनी यापूर्वी विद्यमान आमदारांनी शिफासर केली असेल तर पुराव्या निशी दाखवावेत. त्यामुळे पालिका दर्जाविषयी आ. चव्हाण यांच्या डोक्यात काय होते? असा प्रश्न अशोकराव थोरात यांनी उपस्थित केला.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |