फलटण : सपकळवाडी ता. फलटण येथील कल्पेश भाऊसो सपकाळ हा चिमुकला ३० जानेवारीपासून बेपत्ता होता. याप्रकरणी फलटण पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यातआली होती. त्याआधारे पोलिसांनी तपास केला असता, काल दि. ३ जाने. रोजी कल्पेशचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान या खून प्रकरणी पोलिसांनी कल्पेशचा मामा पांडुरंग सदाशिव घाडगे याला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सपकळवाडी ता. फलटण येथील कल्पेश भाऊसो सपकाळ (वय ७) हा चिमुकला ३० जानेवारी पासून घरातून गायब झाला होता. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलाची आई सौ.रंजना भाऊसो सपकाळ यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस तपास करीत होते. तपास करत असताना मुलाचा मामा पांडुरंग सदाशिव घाडगे (वय ३७) रा. सपकळवाडी ता. फलटण मूळ रा. चिंचणी, ता. खटाव, याच्यासोबत कल्पेशला काही लोकांनी शेवटचे पाहिले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी पांडुरंगचा पुर्वेइतिहास तपासला असता पांडुरंग घाडगे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी पांडुरंगला ताब्यात घेऊन पोलिसी 'खाक्या' दाखवला असता, कल्पेशच्या खुनाची पांडुरंगने कबुली दिली. दि. ३० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कल्पेश यास वडापाव खायला देतो असे आमिष दाखवून सपकळवाडी येथील ओढ्याच्या बाजूला असलेल्या शेताजवळ गळा दाबून संशयित आरोपीने कल्पेशचा खून केला. आणि पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने त्याच वेळी मृतदेह विहीरीमध्ये टाकून दिल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पांडुरंग घाडगे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग घाडगे याने संपत्तीच्या लालसेतून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान मामाच्या या कृत्यामुळे फलटण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
फलटण पोलिसांच्या दृष्टीने अतिशय किचकट बनलेल्या या गुन्ह्याच्या तपास फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मांजरे, सपोनि. बोंबले, पो.नि. नाळे यांनी केला असून याबाबत अधिक तपास सपोनि. बोंबले करीत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |