कराड : कराड बसस्थानकामध्ये एस.टी. पाठीमागे घेत असताना एस.टी.ची धडक बसून सातारा येथील वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवार दि. 13 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघात विभागाचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, उपचार सुरू असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जखमी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एस.टी. चालकाला ताब्यात घेतले आहे.
खुर्शिद अब्दुलहमीद शेख (वय 73, रा. गुरुवार पेठ, सातारा) असे एस.टी.ची धडक बसून ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सयाजी हिंदुराव यादव (वय 49, रा. अतीत, ता. जि. सातारा) असेपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एसटी चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड स्थानकामध्ये कराड-जिंती एसटीचे चालक आपल्या ताब्यातील एसटी पाठीमागे घेत असताना त्या एसटीची संरक्षक भिंतलगत उभ्या असलेल्या खुर्शिद शेख यांना धडक बसली. यामध्ये त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. बसस्थानकावरील फेरीवाले व भावाने त्यांना उपचारासाठी रिक्षामधून त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल केले.
एसटी पाठीमागे घेत असताना एसटीचे वाहक संजय शिंगारे यांनी शिट्टी वाजवून तसेच एसटीवर हाताने जोरजोरात मारून आवाज करत चालक सयाजी यादव यांना इशारा केला होता. मात्र, चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत एसटी न थांबविता तशीच मागे घेतल्याने हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरून समजले. यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी जमली होती.
दरम्यान, उपचार सुरू असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अपघातस्थळी भेट देऊन माहिती घेत तपासाच्या अनुषंगाने पोलीस कर्मचार्यांना सुचना केल्या. अपघात विभागाचे पोलीस कर्मचारी खलील इनामदार व प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली असून ज्ञानेश्वर काळे यांनी याबाबतची खबर पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
भावानेचे बहिणीला उपचारासाठी नेले रुग्णालयात...
कराड एस.टी. डेपोतील वाहतूक नियंत्रक मुराद मुजावर यांच्या खुर्शीद शेख या बहीण आहेत. भावाला भेटण्यासाठी त्या सातारहून कराडला आल्या होत्या. भेट झाल्यानंतर मंगळवारी सकाळी त्या परत सातारला निघाल्या होत्या. त्यांना सोडण्यासाठी भाऊ मुराद मुजावर हेही बसस्थानकावर आले होते. अपघात झाल्याचे समजताच त्यांनीच रिक्षातून आपल्या बहीणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |