RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

सोडलेली गॅस सबसिडी पुन्हा मिळवण्याची संधी

09 October 2018 at 15:40

नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान सोडलेल्या किंवा आतापर्यंत ही सवलत न घेतेलेल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. या अनुदानाचा लाभ ते पुन्हा घेऊ शकतात. असे सुमारे दोन कोटी ग्राहक आहेत. तेल कंपन्यांनी ही माहिती दिली. तेलाच्या वाढत्या भावांमुळे अनुदान सवलत सोडणाऱ्या ग्राहकांना ही सवलत सोडल्याचा पश्चात्ताप होत असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. 

तेलाच्या दरात वाढ झाल्याने गेल्या दोन वर्षांत अनुदान नसलेल्या गॅस सिलिंडरचा दर ३८९ रुपये इतका वाढला. ही वाढ ७९ टक्के आहे. यानंतर ही सबसिडी सोडलेल्या ग्राहकांनी ती पुन्हा मिळेल का असा विचार करायला सुरुवात केली होती. अनुदानपात्र गॅस सिलिंडरचा भाव या दोन वर्षांत १७.६ टक्के वाढला आहे. म्हणजेच १४ किलोंच्या घरगुती सिलिंडरवरचे अनुदान दोन वर्षांपूर्वी ६२.९ रुपये होते ते वाडन ३७६.६ रुपये झाले. ही वाढ ६ टक्के आहे. 

देशात २४.५ कोटी घरगुती गॅसचे ग्राहक आहेत. यापैकी ८.३ टक्के म्हणजेच सुमारे २ कोटी ग्राहकांना अनुदान मिळत नाही. सुमारे १.०४ कोटी ग्राहकांनी गेल्या काही वर्षांत अनुदान सवलत सोडली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर 'गिव्ह इट' मोहिमेंतर्गत तेल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना हा नवा पर्याय द्यायला सुरुवात केली. ज्यांना अनुदान सवलत नको असेल त्यांना सुरुवातीपासूनच ही सवलत नाकारण्याचा पर्याय देण्यात आला. ज्यांना हे अनुदान मिळण्यासाठी बँकेत खाते वा आधार डीटेल्स नाहीत असेही ग्राहक अनुदान न मिळणाऱ्यांच्या यादीत आहेत. 

ही सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांना प्रतिज्ञापत्राद्वारे कळवावे लागते की त्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांहून कमी आहे. आपले बँक, आधार डिटेल्सही द्यावे लागतात. 


Baliram Tulshiram kirdat


Baliram Tulshiram Kirdat

सबसिडी परत मिळावी


पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ

पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. पासपोर्टच गायब झाल्याने सुरक्षा यंत्रणाना अलर्ट करण्यात आले आहे. गहाळ झालेले बहुतांश पासपोर्ट शीख भाविकांचे आहेत.

yesterday

महाप्रसादातून विषबाधा; १२ जणांचा मृत्यू

महाप्रसादातून विषबाधा होऊन 12 भाविकांना जीव गमवावा लागल्याची घटना चामराजनगरातील हनूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी घडली. सुमारे 70 जण अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. प्रसादात कीटकनाशकाचा अंश आढळून आला आहे. हा घातपात असण्याची शक्यता असून

yesterday