सातारा : कुर्हाडीने वार करून वडिलांचा खून केल्याप्रकरणी गोळेवाडी, ता. फलटण येथील सुहास सतीश उंबरे (वय 24) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
दि. 1 मे 2016 रोजी दुपारी सतीश देवराज उंबरे (वय 62) हे मद्यपान करून आले होते. त्या नशेमध्येच पत्नी लता सतीश उंबरे (वय 45) यांना त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलगा सुहास उंबरे याने ही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असणार्या सतीश यांनी सुहासवरही कुर्हाडीने घाव घातला. यामध्ये त्याच्या हाताला जखम झाली. याचा सुहासला राग आला यातूनच सुहासने वडील सतीश यांच्या डोक्यात कुर्हाड घालून त्यांचा खून केला.
याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार एस. व्ही. लांडे यांनी केला होता. तपास पूर्ण करून त्यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सहायक जिल्हा सरकारी वकील अॅड. अजित कदम (साबळे) यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यामध्ये एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सुहास उंबरे याला दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. ए. ढोळकीया यांनी 3 वर्षांची शिक्षा सुनावली.
या खटल्यात प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक पी. के. कबुले, हवालदार शमशुद्दीन शेख, संजय पाटील, सुनील सावंत, नंदा झांजुर्णे, कांचन बेंद्रे आणि अजित शिंदे यांनी सहकार्य केले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |