सातारा : व्याजाने दिलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी घरात घुसून साहित्याची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी देणार्या कोडाली (ता.सातारा) येथील रणजीत खवळे याच्याविरोधात खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कृष्णात आत्माराम जाधव (रा.कोडोली) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. ते हमाली काम करतअसून जानेवारी 2016 त्यांनी कोडोली येथे राहणार्या रणजीत खवळे याच्याकडून 20 हजार रुपये दरमहिना 20 टक्के व्याजाने घेतले होते. व्याजाने घेतलेल्या रक्कमेपोटी जाधव यांनी एकूण 70 हजार रुपये खवळे याला परत केले होते. एवढी रक्कम परत करुनही खवळे हा मुद्दल बाकी असल्याचे सांगून जाधव यांना धमकावत होता.
दि. 20 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खवळे हा जाधव यांच्या घरी गेला व घरात घुसून होमथिटरची तोडफोड केली. तोडफोड करताना खवळे याने मुद्दल न दिल्यास घरातील साहित्य घेवून जातो असे सांगून साहित्य उचलण्यास सुरुवात केली. जाधव यांनी विरोध करताच चिडलेल्या खवळेने जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीवेळी जाधव यांच्या पत्नी आल्यानंतर त्यांनाही खवळे याने मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर मुद्दल न फेडल्यास जीवे मारण्याची धमकी देत खवळे तेथून पसार झाला. कृष्णात जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाल्यानंतल संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार जाधव करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |