06:23pm | Mar 21, 2019 |
सातारा : माढ्याचा तिढा 'मार्च-एंड' आला तरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. युती आणि आघाडीकडूनही माढ्यासाठी अधिकृत उमेदवाराची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी सुप्रिमोंनी लढणार-लढणार म्हणत शेवटच्या क्षणी तलवार म्यान केल्यामुळे माढ्याचा तिढा वाढला. या तिढ्यात अनेकांनी उड्या घेतल्या. पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या मोहिते-पाटलांनी मोक्याच्या वेळी भाजपात कोलांटउडी मारल्यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर आलेली आहे. या संधीचा फायदा घेत कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माढ्याच्या जागेवर कॉंग्रेसचा दावा सांगितल्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. दरम्यान, माढ्याची जागा कॉंग्रेसला सोडल्यास दोन्ही रणजितसिंहांमध्ये माढ्याचे ‘रण’ होणार, हे मात्र निश्चित झाले आहे.
2009 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत माढा हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला होता. या मतदारसंघामध्ये सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तालुके येतात. यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील फलटण, माण-खटाव आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस हे विधानसभा मतदारसंघ येतात. भौगोलिकदृष्ट्या हा लोकसभा मतदारसंघ जरा किचकटच. कृष्णा आणि भीमेच्या पाण्यावर पोसलेला हा भाग. साखर कारखानदारीच्या जोरावर चालणार्या राजकारणामुळे येथील पुढारीही हेवीवेट समजले जातात. 2009 साली याही मतदारसंघावर अनेकांनी आपला हक्क सांगितला होता. माळशिरस व फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यानंतर या दोन्ही तालुक्यातील विद्यमान आमदारांना उपरे व्हावे लागले होते. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी सुप्रिमोंकडे आमचे पुनर्वसन करा, असे सांगत माढ्यावर दावेदारी सांगितली होती. परंतू बंडाळ्या मोडण्यात माहीर असलेल्या राष्ट्रवादी सुप्रिमोंनी दोघांनाही ‘लॉलिपॉप’ देऊन स्वत: माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. माढ्याच्या पहिल्याच निवडणुकीत शरद पवार विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले होते. त्यांच्या विरोधात असणार्या भाजपच्या सुभाष देशमुख यांना पवारांच्या तुलनेत 23.51, तर रासपच्या महादेव जानकरांना 10.76 टक्के मते मिळाली होती.
मात्र, 2014 साली शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करत अनेकांना धक्का दिला होता. त्यामुळे आतासारखेच त्यावेळेसही त्रांगडे निर्माण झाले होते. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. मोहिते-पाटलांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवण्यात आले होते, तर विजयसिंह मोहिते-पाटलांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे अपक्ष म्हणून विरोधात उभे राहिले होते. या निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या सदाभाऊंचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. निसटता का होईना याठिकाणी राष्ट्रवादीने माढ्याची गढी राखण्यात यश मिळवले होते.
गेल्या आठवड्यातच ‘सातारा टुडे’ने माढा व सांगली लोकसभा मतदारसंघ ‘एक्सचेंज’ होणार याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याच पद्धतीने माढ्याच्या पटावर आता सोंगट्या पडू लागल्या आहेत. सांगली लोकसभेसाठी भाजपच्या विरोधात पर्यायी असा उमेदवार कॉंग्रेसला मिळत नाही. दिवंगत मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजिव विश्वजित कदम यांच्यासह अनेक नावांची कॉंग्रेसने चाचपणी केली. मात्र, कॉंग्रेसला भाजपच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार सांगलीतून मिळत नाही. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांच्या बाबत कॉंग्रेस हायकमांड साशंक आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा पारंपारिक असलेला सांगली मतदारसंघ राष्ट्रवादीला देवून त्या बदल्यात माढा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा, अशी मागणी कॉंग्रेसकडून होवू लागली आहे. सांगली लोकसभेला राष्ट्रवादीतून माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
फलटण व माण-खटावमधूनही माढ्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याबाबत एकमत होवू लागले आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजिव रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा आजपावेतो झालेली नाही. फलटणमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा आणि राष्ट्रवादीला गाडा, असा नारा देण्यात आला होता. आघाडीत असूनही फलटणमधील राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.त्यामुळे अशा लबाडा घरच्या आवतणाला कार्यकर्त्यांनी भुलणार नसल्याचा इशाराही दिला होता. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, धनगर नेते उत्तमराव जानकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह तीन आमदार व एक माजी आमदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी माढ्यासाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे. अकलूज सोडले तर मोहिते-पाटलांचा करिष्मा कोठे-कोठे चालेल हे आत्ता सांगता येणार नाही. 2009 साली शरद पवारांना टक्कर देणारे मंत्री सुभाष देशमुख ऐनवेळी पक्षादेश मानून मोहिते-पाटलांना मदत करणार, की नुरा कुस्ती करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, आगामी निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये माढ्याच्या गढीसाठी घमासान होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी सुप्रिमो आपल्या अनुभवाचे तणनाशक माढ्यावर फवारल्यानंतर 'तण' जळून जाणार की पीक जोमात येणार, हे येणार्या काही दिवसांमध्ये समजणार आहे.
- संग्राम निकाळजे
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |