10:29pm | Dec 31, 2018 |
सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेचे जाळे निर्माण केले. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले इंग्रजी भाषा समजू शकले असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था, पवारवाडी येथील सदस्य व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र वारागडे यांनी शिरवळ येथे केले.
शिरवळ ता. खंडाळा येथील रयत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प कृषी सभापती मनोज पवार, स्कूल चेअरमन उदय कबुले, प्रा. एच एस पोळ, स्कूल मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी घोंगडे व मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीमाई फुले यांच्या नायगाव नजिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गरिबांचीही मुले शिक्षण पूर्ण करीत आहेत याचा अभिमान वाटू लागला आहे. कर्मवीरांनी आपल्या कार्यातून या भागाला तसेच पवारवाडी ता. जावळी येथे 1952 साली शाळा सुरू केली होती. त्या शाळेला सदैव मदत करीत असल्याने रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कार्यक्रमाला बोलवतात असेही श्री वारागडे यांनी सांगितले.
मुख्यध्यापिका सौ. घोंगडे, रामचंद्र भोई, आप्पासाहेब देशमुख, डी पी घोरपडे, शिहान परमाजित सिंग, दिलीप गुंजवटे यांनी ही मनोगत व्यक्त केले.तसेच बाल विद्यार्थ्यांनी कला गुण सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. शिरवळ भागाची प्रगती साधली आहे. सध्या शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या इतकीच मराठी भाषा व संस्कृतीची ही या रयत शिक्षण संस्थेत काळजी घेतली जात आहे. त्यामुळे दि 3 जानेवारी या शिक्षण माता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अभिवादन करण्यात येईल तसेच या शाळेला भेट दिली जाईल अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान,दि 3 जानेवारी रोजी नायगाव येथे शिक्षण मातेला नम्रपणे वंदन करण्यासाठी जिल्ह्यातील मान्यवर शिक्षण प्रेमी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती स्थानिक पालकांनी दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |