05:31pm | Sep 23, 2019 |
कराड : शेणोली ता. कराड येथे व्यायामाला गेलेल्या तीन युवकांना कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास कराड-तासगाव रस्त्यावर शेणोली-भवानीनगर दरम्यान घडलेल्या या घटनेत तीन युवक जागीच ठार झाले. तर रस्त्यालगत व्यायाम करत असलेला एकजण या घटनेत सुदैवाने बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थ, प्रवाश्यांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेत विशाल धोंडीराम गायकवाड, प्रवीण हिंदुराव गायकवाड व दीप ज्ञानू गायकवाड अशी घटनेत जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. तर रोहित आनंदराव गायकवाड (सर्व रा. सम्राटनगर, शेणोली) हा या घटनेत बचावला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड-तासगाव रस्त्यावर शेणोली-भवानीनगर दरम्यान पहाटेच्या सुमारास विशाल, प्रवीण, दीप व रोहित हे युवक नेहमीप्रमाणे व्यायामासाठी गेले होते. सोमवार दि. 23 रोजी शेणोली गावानजीक रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव कंटेनरने यातील विशाल गायकवाड, प्रवीण गायकवाड व दीप गायकवाड या तिघांना चिरडले. त्यामध्ये ते जागीच ठार झाले. तर याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेला रोहित गायकवाड हा या घटनेत सुदैवाने बचावला आहे.
दरम्यान, घटनास्थळानजीक असलेल्या वस्तीतील लोकांनी या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. मात्र, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे शेणोली गावासह परिसर व तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तसेच या तीनही युवकांच्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |