RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन

21 July 2019 at 02:42

दिल्लीत दोन दिवस राजकीय दुखवटा

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झाल्याने दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत कोणताही सरकारी कार्यक्रम होणार असून भाजपनेही आज आणि उद्या होणारे पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दरम्यान, देशभरात काँग्रेसची वाताहत होत असताना शीला दीक्षित यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दीक्षित यांच्या निधनावर काँग्रेसमधून शोक व्यक्त होत आहे. 

शीला दीक्षित यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दिल्लीतील एक्सॉर्ट रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. दीक्षित यांच्या निधनावर काँग्रेसमधून शोक व्यक्त होत आहे. देशभरात काँग्रेसची पडझड होत असताना शीला दीक्षित यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

शीला दीक्षित यांनी तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषावलं आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित यांना ओळखलं जातं. ३१ मार्च १९३८ रोजी शीला दीक्षित यांचा जन्म पंजाबमधील कपूरथला येथे झाला होता. शीला दीक्षीत यांचे शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतली.

शीला दीक्षित यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभेच्या खासदार होत्या. १९८६ ते १९८९ या कालावधीत शीला दीक्षित यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. शीला दीक्षित यांची २०१४ मध्ये केरळ राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांनी २५ ऑगस्ट २०१४ मध्ये राजीनामा देत काँग्रेसमध्ये पूर्णकाळ कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या लोकसभा निवडुकीत शीला दिक्षीत यांना भाजपाच्या मनोज तिवारीकडून पराभवचा धक्का बसला आहे. १९८४ ते १९८९ या कार्यकाळात शीला दीक्षित यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचं लक्ष वेधलं होतं.

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शीला दीक्षित यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. त्यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला, त्यासाठी नेहमीच त्यांचं स्मरण केलं जाईल, असं राष्ट्रपतींनी शोक संदेशात म्हटलं आहे. तर शीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं. दिल्लीच्या विकासासाठी त्यांनी अभूतपूर्व काम केलं, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे. 

 

माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

yesterday

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18