कोरेगाव/पळशी : विहिरीत वडिलांसमवेत पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोरेगाव येथे घडली. पाठीवरील बांधलेला कॅन सुटल्याने आठ वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागले आहेत. वेदांत दीपक सोनावणे (वय 8, रा. भगवा चौक, कोरेगाव) असे या चिमुरड्याचे नाव आहे.
याबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, दीपक सोनावणे यांचे गाव गारूडी (डिस्कळ) ता. खटाव हे असून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत.शिक्षणासाठी त्यांची पत्नी व दोन मुले कोरेगाव भगवा चौक येथे नातेवाईकांच्या शेजारी भाड्याने खोली घेवून वास्तव्यास आहेत. दीपक हे तीन दिवसांपूर्वीच सुट्टी काढून गावी आले आहेत. शनिवार दि. 26 रोजी मुलगा वेदांत याला घेवून घोल डगरी नावाच्या शिवारातील शिंदे यांच्या विहिरीवर पोहायला शिकवण्यासाठी ते गेले होते. वेदांतच्या पाठीला प्लास्टीकचा कॅन बांधून पोहण्यासाठी त्याला विहिरीत सोडले होते. त्याच्या समवेत आणखीन सात ते आठ मुले पोहत होती. मात्र या गडबडीत वेदांतच्या पाठीवरील कॅन सुटून तो विहिरीत बुडाला. सुमारे पाच मिनिटांनंतर ही बाब दीपक यांच्या लक्षात आली. त्यानंतर बराच प्रयत्न करून वेदांतला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने उपचारासाठी कोरेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेदांत याच्यावर त्याच्या गावी गारूडी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने भगवा चौक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याबाबतची फिर्याद अभिजीत सुरेश अहिरे यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दिली असून पोलिस ह. गोसावी अधिक तपास करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |