RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कृष्णा कारखाना एक कुटुंब : डॉ. सुरेश भोसले

14 April 2019 at 01:55

‘कृष्णा’चे 11.58 लाख टन ऊस गाळप; गळीत हंगामाची सांगता

कराड : कृष्णा कारखाना एक कुटुंब असून सभासद, कर्मचारी व तोडणी वाहतूकदार हे या कुटुंबाचे प्रमुख सदस्य आहेेत. आपण सर्वांनी एकसाथ राहिल्यास संस्थेची प्रगती कोणही रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी केले.  

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सन 2018-19 च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कविता पाटील यांच्या शुभ हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या तोडणी मजूर, मुकादम, कंत्राटदारांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्हा.चेअरमन जगदीश जगताप, संचालक गुणवंतराव पाटील, धोंडीराम जाधव, जितंेंद्र पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, दिलीपराव पाटील, निवासराव थोरात, अमोल गुरव, पांडूरंग होनमाने, ब्रिजराज मोहिते, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.सुरेश भोसले पुढे म्हणाले अधिकारी, ऊस तोडणी मजूर ,वाहतूक कंत्राटदार व कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे कारखान्याने चांगली कामगिरी केली आहे.  पुढील गळीत हंगाम हा ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी लागणार आहे. कारखान्याची यंत्र सामुग्री 60 वर्षे जुनी असल्याने काही तांत्रीक अडचणी येतात. परंतू या अडचणींवरही मात करत कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे असे गौरवोद्गार चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी काढले. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी म्हणाले, कारखान्याच्या गळीत हंगामात उसतोडणी वाहतुकदार यांनी चांगले सहकार्य केले. नेहमीच उसतोडणी वाहतुकदारांच्याकडून कारखान्यास चांगले सहकार्य होत असते असे सांगत कारखाना प्रगतीचा आलेख सादर केला. उत्कृष्ठ गट कार्यालय म्हणून रेठरे बुद्रुक गट कार्यालयाचा सन्मान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. 

सेक्रटेरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे, चिफ इंजिनिअर सुहास घोरपडे, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, फायनान्स मॅनेजर सी.एन.मिसाळ, असि.जनरल मॅनेजर डिस्टीलरी प्रतापसिंह नलवडे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, को-जन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, ई.डी.पी मॅनेजर अवधूत रेणावीकर, लेबर ऍन्ड वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील, पर्चेस ऑफिसर रविंद्र देशमुख, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, उसपुरवठा अधिकारी अजय दुपटे, वाहतुक अधिकारी गजानन प्रभुणे, स्टोअर किपर जी.बी.मोहिते यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी केले. रामभाऊ सातपुते यांनी सुत्रसंचालन केले. धोंडीराम जाधव यांनी आभार मानले.

मिस्टर रामराजे साहेब...तुमच्याकडे भीक मागायची वेळ कधीच येणार नाही

माण खटाव मतदारसंघात गेली दहा वर्षे स्वखर्चातून जनतेच्या प्रेमाखातर कोट्यावधी रूपयांची विकासकामांबरोबरच टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांना अखंडपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.

9 hours before

प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; परवा जिल्ह्यातील २५ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यात मंगळवारी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या सतराव्या लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्त गेले तीन आठवडे चालू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आली.

10 hours before

वेब कास्टींग व जीपीएस कंट्रोल रुमला निरीक्षकांची दिली भेट

वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुमला आज निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा, खर्च पडताळणी निरीक्षक अल्पेश परमार, पोलीस विभागाकडील निरीक्षक सुरीदरकुमार कालीया यांनी भेट दिली.

11 hours before

माथाडींच्या घर घोटाळ्यातील दहशतीचे आधी उत्तर द्या

माथाडी कामगारांसाठी नवी मुंबई येथे असलेली राखीव घरे अपात्र लोकांना मिळवून देण्याचे आमिष दाखवून, 104 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

11 hours before