03:30am | May 01, 2019 |
सातारा : मांडवखडक ता.फलटण येथील दरोडा प्रकरणातील दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने गजाआड केले आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या गंभीर घटनेचा छडा लागल्यानंतर संशयितांकडून मुद्देमालही जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मांडवखडक येथील दरोड्याप्रकरणी महेश महादेव जाधव (वय 24, रा.तावडी) व करण उर्फ किरण लाला चव्हाण (वय 24, रा.विंचुर्णी दोघे ता.फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 26 रोजी मध्यरात्री मांडवखडक येथे संशयित पाच जणांच्या टोळक्याने तलवार, लाकडी दांडके याच्या सहाय्याने अक्षरश: दहशत घातली. तक्रारदार नितीन दादासो निकाळजे (रा.मांडवखडक) यांच्या घरासमोर हा दरोडा पडला होता. संशयितांनी शस्त्रांच्या धाकाने झोपेत असलेल्यांच्या निकाळजे यांच्या आईच्या गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले होते. यावेळी आरडाओरडा झाल्याने परिसरातील ग्रामस्थ जागे झाले.
ग्रामस्थ झोपेतून उठल्याने संशयितांनी तेथून पळ काढला. यावेळी निकाळजे कुटुंबियांनी दरोडेखोरांना प्रतिकार केल्याने त्यांनी दगडाने मारहाण करुन जखमी केले होते. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलिसांसमोर आव्हानात्मक बनले होते. एलसीबीचे पथक तपास करत असताना संशयित दोन दरोडेखोर सापडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दरोड्याची कबुली दिली आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव सावंत, मयुर देशमुख, गणेश कचरे, मारुती अडागळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |