सातारा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवडी करण्यात येत आहेत. खांदेपालट होवू लागली आहे.
राज्याचे प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर सातारा जिल्हाध्यक्षही बदलणार असल्याच्या हालचाली सुरु होत्या. परंतु केवळ एकच नाव पुढे आले ते सुनील माने यांचे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील माने यांची निवड होणार असून त्यावर दि. 7 रोजी शिक्कामोतर्ब होणार आहे. आज होणाऱया मेळाव्यानंतर जिह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱयांची बैठक होणार आहे. त्यामध्ये याच्या अनुषंगानेचर्चा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिह्यात प्राबल्य आहे. त्यामुळे या पक्षातले कोणतेही पद मिळाले तरी ते घेण्यासाठी अनेकजण शक्तीप्रदर्शन दाखवत नेत्यांवर प्रभाव पाढत असतो. नुकत्याच राज्यात राजकीय मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक बदल केले जात आहेत. साताऱयातही क्रियाशील सभासदांची मोट बांधण्यात येणार असून त्याच अनुषंगाने नव्या दमाचा अध्यक्ष कसा असावा यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. अनेकांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. परंतु जिह्यातील वरीष्ठ नेते मंडळींनी खमक्या जिल्हाध्यक्ष म्हणून केवळ सुनील माने हेच चांगले काम पाहू शकतात. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूकीमध्ये ते प्रभावीपणे बांधणी करु शकता. त्यामुळे त्यांच्याच नावाची शिफारश ज्येष्ठ मंडळीकडून वरीष्ठ पातळीवर करण्यात आली आहे.
एक युथ दहा युथ या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा वाढेफाटा येथील साई मंगल कार्यालयात आयोजित केला आहे. त्या मेळाव्यानंतर दुपारी प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. त्याचवेळी दि. 7 रोजी निवड करण्यात येणाऱया जिल्हाध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोतर्ब करण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होती. तशा इच्छाही वरीष्ठांकडे व्यक्त केल्या होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षांतील शिष्टमंडळाकडून येवू घातलेल्या निवडणूकांच्या अनुषंगाने सुनील माने हेच महत्वाची जबाबदारी पेलू शकतील, असे सुचवले गेले. त्यानुसार शिफारसही पाठवण्यात आल्याने आता सुनील माने यांच्या नावाचीघोषणाच होणे बाकी आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |