RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

हाँगकाँग स्पर्धेत कराडच्या सिया शहाला सुवर्णपदक

04 August 2018 at 02:33

कराड : हाँगकाँग येथे नुकत्याच संपन्न झालेल्या वर्ल्ड सिटी कप काँम्पिटीशन-2018 अँबॅकस इंटरनॅशनल स्पर्धेत 6 वर्षे वयोगटात भारताचे प्रतिनिधीत्व करणारी कराडची कु.सिया निखिल शहा सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत अमेरिका,चीन,जपान, आँष्ट्रेलिया, सिंगापुर, मलेशिया, कोरियासह जगभरातील 18 देशांमधील 400हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. स्पर्धेत भारतातून सहभागी स्पर्धकांपैकी कु.सिया शहा ही सुवर्णपदक मिळविणारी एकमेव भारतीय स्पर्धक ठरली आहे.

या यशाबध्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कु.सियाचे अभिनंदन व कौतूक केले. श्री पार्श्वनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष व कराड जनता बँकेचे ज्येष्ठ संचालक राजीव मणिलाल शहा यांची कु.सिया ही नात तर मणिलाल शहा यांची पनती आहे. अँबॅकसचे विद्यासागर कुलकर्णी व स्नेहा पटवर्धन यांचे तिला या स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन लाभले.