माद्रिद : स्पेनमध्ये करोनाने हाहाकार माजला आहे. करोनाचे थैमान थांबण्यास कोणतीही चिन्ह नसल्याचे चित्र आहे. सोमवारी स्पेनमध्ये ९१३ जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे करोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ७ हजार ७१६ वर पोचली आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या संसर्गामुळे युरोपामध्ये २५ हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे 'एएफपी'ने संकलित केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
स्पेनमध्ये रविवारी ८३८ जणांचे बळी गेले होते. मात्र गेल्या २४ तासांत बळींची आणि रुग्णांची संख्या घटल्याचा दावा प्रशासन करत असतानाच सोमवारी मृतांची संख्या वाढली. सोमवारी, ७८४६ जणांना करोनाची बाधा असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्पेनमध्ये रुग्णांची संख्या सुमारे ८८ हजार झाली आहे. युरोपमध्ये तीन लाख ९९ हजारहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. युरोपियन खंडामध्ये करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीमध्ये ११ हजार ५९१ जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, स्पेनमधील मृतांची संख्या ७७१६ वर पोहचली आहे.
पाकिस्तानमध्ये १२ तासांत ५४ नवे रुग्ण
पाकिस्तामध्ये १,६२५ जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाला असून, १८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १२ तासांमध्ये ५४ नव्य रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली.
इराणमध्ये मृतांचा आकडा अडीच हजारांवर
इराणमधील करोनामृत्यूंचा आकडा सोमवारी २,७५७ वर पोहोचला. तर, रुग्णांचा आकडा ४० हजारवर पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी या संकटाकडे दुर्लक्ष केल्याची टीका करत विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले आहे. इराण फेब्रुवारीपासून करोनाचे लक्ष्य ठरला असून, अद्याप त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |