02:33am | Mar 05, 2020 |
मुंबई : सातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान-मोठ्या प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, सातारा शहरासह अन्य शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मंगळवारी घेतला. या सर्व कामांना प्राधान्य देऊन सातारा जिल्ह्याची कामे त्वरित मार्गी लावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह, राज्यमंत्री शंभुराज देसाई, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह सर्व संबंधित विभागाच्या सचिवांची उपस्थिती होती. यावेळी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या.
आ. शिवेंद्रराजे यांनी सातारा शहराची हद्दवाढ, मेडिकल कॉलेज, बोंडारवाडी धरण प्रकल्प, सातारा एमआयडीसी, सातारा तालुक्यातील अपूर्ण कॅनॉलची कामे, कास प्रकल्पासाठी बजेटमध्ये जादा तरतूद करण्याची मागणी केली. ही सर्व कामे मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
उरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करून दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माण खटाव या भागातील 31 किलोमिटर वितरण प्रणालीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. तसेच मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देवून कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत, असे केल्यास निधीचे योग्य नियोजन करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील इतर विकासकामांकरिता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून निधीचे योग्य नियोजन करुन कामे करावीत. सातारा जिल्ह्यात नवीन एमआयडीसी सुरु करतांना ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येण्यास उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच रोजगार उपलब्ध होवू शकेल. अशा ठिकाणास प्राधान्य देवून भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |