01:17am | Apr 09, 2020 |
सातारा : कोरोना (कोविड-19) व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेसारख्या बलशाली राष्ट्राचेही कंबरडे या कोरोनाने मोडले आहे. देशातही कोरोनाने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, असे असताना कोरोनावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन च्या वापरामुळे सकारात्मक उपचार होत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यूएस)चा साठा मार्च च्या शेवटच्या आठवड्यातच संपलेला होता. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला खुलासा करण्याचे आवाहन केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात मौन बाळगले होते.
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यूएस)च्या औषधाने कोरोनाचा प्रभाव घटतो, असा दावा भारतीय आयुर्विज्ञान अणुसंधान परिषदेचे (आयसीएमआर) अध्यक्ष नमन गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. ही पत्रकार परिषद विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेत असणार्या डॉक्टरांसह अनेक बड्या धेंडांनी मेडिकल तसेच स्टॉकिस्टकडून मोठ्या प्रमाणावर हे औषध खरेदी करुन त्याचा साठा केला. गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनंतर अनेकांनी मेडिकलमध्ये धाव घेतली. मात्र, मेडिकल चालकांनी दोन दिवसांअगोदरच हा साठा संपला असल्याचे ग्राहकांना सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या औषधाची अनुपलब्धता का निर्माण झाली, या संदर्भात जिल्हा प्रशासनाने हे औषध घ्यावे की न घ्यावे? किंवा हे मेडिकलमधून अचानक गायब कसे झाले, याबाबत खुलासा करणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने या महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देत आपली कोती मनोवृत्ती दाखवून दिली. मात्र कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेटंट कायद्यात बदल करुन आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध भारताने द्यावे, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिल्याने लोकांना, इतकेच काय सातारा जिल्हा प्रशासनलाही हायड्रोक्सीक्लोरोक्वीन चे महत्त्व पटले. परंतू यासंदर्भात ‘सातारा टुडे’ने 29 मार्च म्हणजेच सुमारे दहा दिवसांपूर्वी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला खुलासा करण्याचे आवाहन केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात मौन बाळगले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन चा खुलासा केला, अशा विनोदी चर्चाही सातार्यात झडत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |