05:54pm | Jan 16, 2020 |
सातारा : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. असे असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ओढल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. या पार्श्वभूमीवर काल एका वृत्तपत्राच्या मुलाखतीदरम्यान खा. संजय राऊत यांनी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे कालपासूनच सातारा शहरात लोकांमध्ये चीड निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने आज उदयनराजे प्रेमींसह हजारो सातारकर रस्त्यावर उतरत त्यांनी ‘सातारा बंद’चे आव्हान केले होते. यानुसार आज सातार्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शिवसेनेचे राज्यसभा खा. संजय राऊत यांनी ‘त्या’ वादग्रस्त पुस्तकाच्या अनुषंगाने छत्रपतींच्या वंशजांनी आपले राजीनामे द्यावेत, असे वक्तव्य केले होते. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून शिवसेना-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. जगात शिवरायांच्या बरोबरीचा कोणीच नाही, असे म्हणत जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज असे सांगत त्यांनी शरद पवारांचाही समाचार घेवून शिवसेनेनं त्याचे नाव बदलून ठाकरे सेना करावे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. उदयनराजेंच्या या वक्तव्यावर काऊंटर अटॅक करुन खा. राऊत यांनी काल एका वृत्तपत्राच्या मुलाखतीदरम्यान छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असे भडक वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर सातार्यात लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कालपासूनच सातारा बंद विषयीचे मॅसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर आज सकाळी उदयनराजे प्रेमी, आ. शिवेंद्रहसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांनी गांधी मैदान ते पोवई नाका दरम्यान निषेध रॅली काढत सातारा बंद चे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सातार्यातील व्यापार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत खा. संजय राऊतांचा निषेध म्हणून आपापली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली येथील देवी चौकात संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले, तर उदयनराजेंचे कट्टर समर्थक सुनील काटकर तसेच माजी जि. प. सदस्य संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाक्यावर गाढवांना संजय राऊत व मंत्री जितेंद्र आव्हाडांचे मुखवटे चढवून संजय राऊत, आव्हाड तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना शिवराळ भाषेत निषेध नोंदवत भविष्यात संजय राऊताला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असे इशारेही देण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |