12:14am | Aug 28, 2018 |
कराड : चिकुन गुनिया या आजाराच्या साथीने रेठरे बुद्रुक, ता. कराड या गावाला विळख्यात घेतल्याचे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जागे झालेल्या जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने यांची दखल घेतली आहे. जिल्हा हिवताप विभागाचे पथक रेठऱ्यात दाखल झाले. गेल्या दोन महिन्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच सध्या चिकून गुनिया सदृश्य त्रास होत असलेल्या पाच रूग्णांच्या रक्ताचे नमुने सोमवारी तपासणीसाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. यावेळी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा आरोग्य विभागाला का अंधारात ठेवण्यात आले, असा जाब विचारत त्यांची झाडाझडती घेतल्याचे समजते.
वीस हजाराहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या रेठरे बुद्रुक गावात जुलै महिन्यापासून ग्रामस्थांना चिकुन गुनिया सदृष्य साथीच्या आजाराची लक्षणे दिसत होती. शेकडोहून अधिक ग्रामस्थांना ताप, सांधेदुखी, उलटी मळमळ आदी त्रास होत होते. अनेक रूग्णांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेतले. मात्र त्याचा फायदा न झाल्याने खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यास सुरूवात केली. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलेल्या सुचनांकडे ग्रामपंचयतीने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने गावातील चिकुन गुनिया सदृश्य रूग्णात वाढच होत गेली.
याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा हिवताप विभागाची टीम जिल्हा उपआरोग्य अधिकारी डॉ. व्ही. के. फाळके यांच्यासह रेठरे बुद्रुकमध्ये दाखल झाली. यावेळी गावातील काही ठिकाणांची पथकाने पहाणी केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातून चिकुन गुनिया व ताप सदृष्य उपचारासाठी आलेल्या रूग्णांना देण्यात आलेल्या उपचाराची माहिती घेतली. जुलैच्या १५ तारखेनंतर दररोज सुमारे १० ते १५ रूग्ण या त्रासाने प्राथमिक आरोग्य केंद्रात येत होते. यावेळी त्यापैकी काही रूग्णाच्या रक्ताचे नमुने स्थानिक पातळीवर तपासण्यात आले आहेत. तर अनेक रूग्णांनी स्वत: तपासणी केल्याचे यावेळी डॉ. मिरजे यांनी पथकाला सांगितले. तसेच नियमित सव्र्हेकरून ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीला साथीच्या आजारापासून बचावासाठी काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी पथकाला सांगितले.
हिवताप पथकाने सध्या त्रास होत असलेल्या चिकुन गुनिया सदृश्य पाच रूग्णांच्या रक्ताचे नमुने तातडीने पुणे येथील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले. व साथ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने योग्यत्या सुचना प्राथमिक आरोग्य केंद्राला दिल्या आहेत.
चिकुन गुनियाची माहिती दडवली
रेठरे बुद्रुक येथे चिकुन गुनिया सदृश्य साथीचा प्रार्दुभाव झाला आहे. ही माहिती तालुका प्रशासाने जिल्हा आरोग्य विभागाला दिली नाही. सोमवारी याबाबतची माहिती वृतपत्रातून समजली. याचे गांर्भिय लक्षात घेऊन जिल्हा हिवताप विभागाचे पथक व जिल्हा उपआरोग्य अधिकारी डॉ. व्ही. के. फाळके यांना तातडीने रेठरे बुदु्रक येथे पाठवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी बोलताना सांगितले. यामुळे रेठऱ्याच्या साथीच्या आजाराची माहिती जिल्हा आरोग्य विभागापासून दडवण्याचे कारण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मुळावर
रेठरे बुद्रुक येथे चिकुन गुनिया सदृश्य साथीचा प्रार्दुभाव झाला आहे. याची कल्पना वांरवार प्राथमिक आरोग्य केंद्राने ग्रामपंचायतीला दिली आहे. उपाय योजनांबाबत सुचनाही केल्या होत्या. या बाबतचा तसा पत्रव्यवहारही केल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राने हिवताप पथकासमोर सांगितले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले असतेतर या साथीच्या आजाराला सामोरे जाण्याची वेळच ग्रामस्थांवर आली नसती. त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मुळावर उठली आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांच्या प्रतिसादाची गरज
चिकून गुनिया व अन्य साथीच्या सदृश्य रूग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रेठरे बुद्रुकच्या ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. प्रामुख्याने आपला परिसर स्वच्छ ठेवावा, भांडी नेहमी स्वच्छ ठेवावीत, मच्छर होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मच्छर उत्पत्तीची सायकल बे्रक करण्याासाठी आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी मोकळी करून कोरडी करून ठेवावी. तसेच त्रास होणाऱ्या रूग्णांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
- डॉ. मैथिली मिरजे, आरोग्य अधिकारी, रेठरे बुद्रूक
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |