सातारा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे काम सातारा पोलीस कर्तव्यदक्षतेने करीत आहेत. वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेनुसार कायदा व सुव्यवस्था राखताना माणुसकीचेही दर्शन त्यांच्याकडून घडताना दिसत आहे. सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातार्यातील पोलिसांना 80 फेस शिल्डचे वितरण करुन आपल्या पोलीस कर्मचार्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली आहे.
सातारा ही छत्रपतींची राजधानी असल्याने याठिकाणी काम करताना एक मानसिक समाधान असते. नैसर्गिक आपत्ती आली की, सातारचे मावळे जात-पात, धर्म, पंथ विसरुन मदतीसाठी धावून जातात. त्यामुळे पोलिसांचेही अर्धे काम होते. जिल्हा प्रशासनाचा काहीअंशी ताण कमी होतो, हे अनेकदा अनुभवयास आले आहे. सातारा शहरात सध्या पोलीस बांधव निकराचे प्रयत्न करुन जनेतला अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, यासाठी सूचना करीत आहेत. तरीही प्रत्येक पोलीस बांधवांना किमान शंभर लोकांशी संवाद साधावा लागत आहे. त्यामुळे या पोलिसांना संरक्षण मिळणे, हा त्यांचा अधिकार असून परदेशाच्या धर्तीवरच सातार्यातील उद्योजकांनी हे फेस शिल्ड तयार करुन दिले आहे. त्याचे वितरण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस बांधवांना केले आहे. त्यामुळे पोलीस बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अत्यंत आकर्षक व वजनाला हलके असलेल्या या हेल्मेटचा लुक या फेस शिल्डमध्ये पाहण्यास मिळत आहे. हे फेस शिल्ड वॉशेबल असून त्याच्याआतमध्ये आपण तोंडाला मास्कही लावू शकतो. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग होणार नाही, याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच आठवड्यात मुबलक प्रमाणात हे फेस शिल्ड उपलब्ध झाल्यानंतर पोलीस बांधवांना त्याचे वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी पोलीस दलाला सहकार्य करताना तोंडाला मास्क लावणे, ही सामाजिक जबाबदारीच समजावी, असाही संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |