वेणेगाव : मुलाच्या लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी जात असताना ‘भाऊ दा ढाबा’ येथे वळणावर लक्झरी बस व दुचाकीचा बुधवारी दुपारी 1 वाजता अपघात झाला. या अपघातात भीमराव दत्तू घाडगे यांचे निधन झाले. भीमराव यांच्या मुलाचे दि. 11 रोजी लग्न आहे. मात्र, त्यापूर्वी भीमराव यांच्यावर काळाने घाला घातल्याने कामेरी व खोजेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी लक्झरी बसचालक सागर श्रीरंग जाधव (वय 28, रा. जळगाव, ता. कोरेगाव) यांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भीमराव घाडगे यांच्या मुलाचे लग्न 11 मे रोजी कामेरी येथे होणार आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सातारा येथे दुचाकीवरून खरेदीसाठी निघाले होते. त्याचवेळी एक लक्झरी बस (क्रमांक एम. एच. 11 टी. 9419) लग्नाचे वर्हाड घेऊन जात होती. ही बस भाऊ दा ढाब्याच्या समोर आल्यानंतर वळण घेत असताना बस व दुचाकीचा अपघात झाला.
अपघातात भीमराव घाडगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक सागर जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एकुलता एक मुलगा निलेश याचे लग्नाचे साहित्य आणण्यासाठी निघालेल्या पित्यावर काळाने घातला. यामुळे कामेरीसह खोजेवाडी परिसरात शोककळा निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा पर्यंत बोरगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली नव्हती. तपास पोलीस उपनिरीक्षक एम.ए.खान करीत आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |