05:30pm | Nov 23, 2018 |
सातारा : गेले सहा दिवस फलटण येथील अधिकार गृहासमोर स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे उपोषणास बसले होते. मात्र लोकशाही मार्गाने चाललेले हे उपोषण पोलिसांसह स्थानिक सत्ताधार्यांची डोकेदुखी ठरल्यामुळे आज पहाटे पोलिसांनी दिगंबर आगवणे यांच्या उपोषणस्थळावर सशस्त्र हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे व्यथित झालेल्या दिगंबर आगवणे यांनी जवळ असलेले विष प्राशन करुन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे फलटण तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 17 नोव्हेंबरपासून आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व विविध मागण्यांसंदर्भात फलटण येथील युवा नेते व स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर रोहिदास आगवणे रा. गिरवी, ता. फलटण हे आमरण उपोषणास बसले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या पोलिसांकडून मान्य करण्यात आल्या होत्या. परंतू लोणंद, ता. खंडाळा येथील एका गुन्ह्यात विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांनी पोलीस अधिकार्यांवर दबाव टाकून दिगंबर आगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी दमबाजी संबंधित अधिकार्याला केली होती. त्या स्टेशन डायरीची नोंद आगवणे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
मात्र पोलिसांनी दबावापोटी ही मागणी फेटाळून लावली होती. काल आगवणे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. तरीही पोलिसांनी वा प्रशासनाने या उपोषणाची साधी दखलही घेतली नव्हती. पोलिसांनी आगवणे यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र जोपर्यंत मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषण पाठिमागे घेणार नाही, तसेच पोलिसांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यास मी विष पिऊन आत्महत्त्या करेन, असा इशाराही दिला होता. त्या अनुषंगाने त्यांची सुसाईड नोटही सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. मात्र, पोलीस हे आंदोलन दडपून टाकणार ही कुणकूण आगवणे यांना काल रात्रीच लागली होती. त्यामुळे ते उपोषण स्थळासमोर असलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीत बसलेले होते. नेमक्या याचवेळी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत उपोषणस्थळी आले. त्यांनी दिगंबर आगवणेंसह कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांना आमचे उपोषण लोकशाही व संविधानिक मार्गाने चालले आहे, त्यामुळे तुम्ही आमचे उपोषण दडपू शकत नाही, असे सांगितले असता पोलिसांनी उपोषणस्थळावरच काहीही कारण नसताना कार्यकर्त्यांची धरपकड करीत लाठीचार्ज सुरु केला. दिगंबर आगवणे हे उपोषण स्थळासमोरील चारचाकी गाडीत असल्याचे पोलिसांनी बघितल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा त्या गाडीकडे वळवला. त्यांनी गाडीवर काठ्या व दगडांनी हल्ला चढवला. त्यामुळे व्यथित झालेल्या दिगंबर आगवणे यांनी जवळ असलेले विष प्राशन केले. कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर कार्यकर्ते लगेचच गाडीकडे धावले व त्यांनी आगवणे यांना गाडीतून बाहेर काढून येथील सुविधा हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात दाखल केले.
मात्र आगवणे यांची प्रकृती गंभीर बनल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, प्रक्षुब्ध झालेला जमाव जाब विचारण्यासाठी फलटण शहर पोलिस ठाण्यात गेला असता पोलिसांनी यावेळी तुफान लाठीचार्ज केला. यामुळे अनेक कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. दिगंबर आगवणे यांच्या पत्नी व पंचायत समिती सदस्या जयश्री आगवणे यांच्यासह अनेक महिलांना फलटण पोलीस ठाण्यात पुरुष पोलीस कॉन्स्टेबलकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये जयश्री आगवणे यांच्यासह अनेक महिलाही गंभीर जखमी झालेल्या आहेत. पोलिसांकडून उलट तालुक्यातील अनेक गरीब कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान दिगंबर आगवणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
सभापती मिस्टर रामराजेंचा प्रशासनावर दबाव?
दिगंबर आगवणे गेल्या सहा दिवसांपासून फलटण येथील अधिकारगृहासमोर उपोषणास बसले होते. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही गंभीर दखल घेण्यात आली नव्हती. मिस्टर रामराजेंच्या आदेशाने पोलीस माझ्यावर हल्ला करुन माझा जीव घेणार, अशी भीतीही सुसाईड नोटद्वारे दिगंबर आगवणे यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. मात्र, मिस्टर रामराजेंनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिगंबर आगवणे यांचा काटा काढला आहे, अशी चर्चा सध्या फलटण तालुक्यात सुरु आहे.
अन् काळोख्या रात्री पोलीस राक्षस झाले
दिगंबर आगवणे यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांपासूनच फिल्डिंग लावलेली होती. परंतू फलटणमधील एका शक्तीशाली पुढार्याच्या आदेशाची वाट पोलीस पाहत होते. शेवटी पोलिसांना आदेश मिळताच साम-दाम- दंड- भेद हे सर्व हातकंडे वापरुन पोलिसांनी आज पहाटे दिगंबर आगवणे यांच्या उपोषणस्थळी सशस्त्र हल्ला केला. पोलिसांच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे आगवणे यांच्यासोबत असणार्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली. पोलिसांनी बळाचा वापर करीत दिसेल त्याला झोडपून काढले. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पोलीसी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. दिगंबर आगवणे ज्या गाडीत बसले होते. त्या गाडीवरसुद्धा पोलिसांनी लाथाबुक्क्याने, काठीने व दगडाने हल्ला चढवला. या भितीमुळेच हताश झालेल्या आगवणे यांनी विष प्राशन केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
जाब विचारायला गेलो तेंव्हा माझ्यावर लाठीमार झाला: सौ. जयश्री आगवणे
सहा दिवसांपासून शांततेत उपोषण सुरु होते. कोणालाही त्रास नव्हता. माझे उपोषण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास तर मी विषप्राशन करेल, असे दिगंबर आगवणेंनी सांगितले होते. उपोषणस्थळी येवून प्रकाश सावंतांनी आणि शिंगटेंनी कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दिगंबर आगवणे गाडीत बसलेले त्यांनी गाडीत बसूनच विष प्राशन केले. आगवणेंना विषप्राशन करण्याची वेळ का आणली? हे विचारण्यासाठी मी व माझे सहकारी शहर पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्यावेळी डॉ. अभिजीत पाटील, प्रकाश सावंत, शिंगाटे व सहकार्यांनी आमच्यावर लाठीमार केला. महिलांना मारहाण केली. माझ्या दीराला बेदम मारले. अधिकार्यांनी उपोषणस्थळी येवून, ते दडपण्याचा प्रयत्न कोणाच्या सांगण्यावरुन केला, असा सवाल पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री दिगंबर आगवणे यांनी केला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |