05:54pm | Jun 09, 2018 |
फलटण : काल संध्याकाळी झालेल्या धुवॉंधार पावसामुळे फलटण-सातारा मार्गावर असणार्या मिरगांव, ता. फलटण येथील नव्याने तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्यामुळे सुमारे 18 तास या मार्गावरील सर्व वाहतूक बंद होती. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी खाजगी ठेकेदारामार्फत वाहून गेलेला पूल व सिमेंटच्या पाईप पुन्हा त्या ठिकाणी बसवून, त्याला तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
फलटण तालुक्यात सध्या औद्योगिकीकरणाचे वारे जोरात वाहत आहेत. त्यामुळे फलटण-सातारा रस्ता अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे धोकादायक बनलेला आहे. काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली होती. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे जिकिरीचे ठरत होते. अशातच मिरगांव, ता. फलटण येथील तात्पुरत्या स्वरुपात बनविण्यात आलेला पूल काल संध्याकाळी सिमेंटच्या पाईपसह वाहून गेल्यामुळे सुमारे अठरा तास या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सातार्याकडून फलटणकडे प्रवास करणार्या लोकांनी लोणंदमार्गे फलटणला जाणे पसंत केल्यामुळे या मार्गावरील ताण काही अंशी कमी झाला. काल सोशल मिडियावरुन मिरगांव येथील पूल वाहून गेला आहे, तसेच या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांनी लोणंद किंवा निंभोरे मार्गे प्रवास करावा, असा मॅसेज व्हायरल झाल्यामुळे बर्याच लोकांची होणारी गैरसोय टळलेली आहे. त्यामुळे सोशल मिडियाचा असाही एक फायदा या लोकांना झालेला आहे. तसेच जे लोक या मार्गावरुन प्रवास करीत होते, त्या लोकांनी मिरगांवमार्गे निंभोरे मार्गे फलटण असा प्रवास करावा लागल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
फलटण-सातारा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेकठिकाणी साईडपट्ट्या नसल्याने व रस्ता अरुंद असल्यामुळे या मार्गावर रोजच छोटे-मोठे अपघात होत असतात. या मार्गाचे चौपदरीकरण करणे गरजेचे आहे. कापशी, ता. फलटण येथे असणार्या शरयु साखर कारखान्यामुळे साखरेच्या गळीत हंगामामध्ये या मार्गावर मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक केली जात असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या वाहनांची ये-जा होत असल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे धोकादायक बनले आहे. अशातच पावसाळ्यात पूल खचणे, रस्ता वाहून जाणे, या घटना नेहमी घडत असल्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी फलटण तालुक्यामधून होत आहे. काल संध्याकाळी मिरगांव येथील वाहून गेलेला पूल पूर्ववत झाल्यामुळे फलटण तालुक्यातील प्रवाशांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अन्... सभापती मिस्टर रामराजेंनाही घ्यावा लागला ‘यू टर्न’
काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे मिरगांव येथील तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेला पूल वाहून गेल्यामुळे फलटण-सातारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती. अशात सातारा येथील कार्यक्रम संपवून विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर हे फलटणकडे मुक्कामी जात होते. मात्र मिरगांव येथील पूल वाहून गेल्यामुळे रस्ताच बंद झाल्याने मिस्टर रामराजेंना त्यांच्या लवाजम्यासह निंभोरे मार्गे फलटणला जावे लागल्यामुळे त्यांच्या ‘यू टर्न’ची चर्चा फलटण तालुक्यात काल रात्रीपासून सुरु आहे. मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर हे सुमारे दीड दशके सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र सातार्यापासून फलटणसारख्या महत्त्वाच्या शहराला जोडणारा रस्ताही ते गेल्या पंधरा वर्षामध्ये करु शकले नाहीत. चौपदरीकरण सोडाच, परंतू या रस्त्याचे साधे रुंदीकरणही रामराजेंना जमले नसल्यामुळेच काल निसर्गानेच त्यांना त्यांची जागा दाखवून फलटणपासून यू टर्न घेण्यास भाग पाडले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |