RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

जिल्हा परिषदेत मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणासाठीस सदस्यांचा हुंकार

10 August 2018 at 18:04

सभागृहाच्या दारातच ठिय्या आंदोलन

सातारा : आज सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होती. सभा सुरु होण्यापूर्वीच जि. प. सदस्यांनी आक्रमक होत मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावर सभागृहाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सभागृहाच्या दारातच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील वातावरण गोंधळाचे झाले होते.

आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी जिल्हा परिषदेचा चौथा मजला अक्षरश: दणाणून गेला. आज जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होती. जवळपास सर्वच पदाधिकारी या सभेस उपस्थित होते. आज सकाळी अनेक पदाधिकार्‍यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा असे छापलेल्या गांधी टोप्या घातलेल्या होत्या. इतर कोणत्याही जातीधर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण द्या, असे म्हणत सत्ताधार्‍यांसह विरोधकही यामध्ये एकत्र आले होते. यावेळी जि.प. अध्यक्षांशी सदस्यांनी चर्चा केली. तद्नंतर जि. प. अध्यक्षांनी सर्वसाधारण सभेत तसा ठराव घेवू, असे आश्‍वासन दिल्यानंतर सदस्य शांत झाले. दरम्यान, जि. प. ची सर्वसाधारण सभा अद्याप सुरु आहे. आज झालेले आंदोलन हे जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्याचे जाणकारांनी सांगितले. या आंदोलनाची चर्चा जिल्हा परिषद व परिसरात जोरात सुरु आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्‌भावना दिन साजरा करण्यात आला.

11 hours before

कराडच्या मराठा रणरागिनींंचा आझाद मैदानावर ठिय्या ; २३ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनास प्रारंभ

मराठा समाजाला आरक्षण यासह विविध मागणी घेऊन कराडच्या मराठा रणरागिनींनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि. २३ ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करत आहेत.

yesterday

कराड बसस्थानकाचे येत्या तीन महिन्यात उद्घाटन : ना. दिवाकर रावते यांची माहिती

दर दोन वर्षांनी बसस्थानक परिसरात करावे लागणारे डांबरीकरण, त्यावर येणार सातत्याचा खर्च, पडणारे खड्डे यावर कायम स्वरूपी पर्याय म्हणून राज्यातील सर्व बसस्थानक परिसरात काँक्रेटीकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

yesterday

बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ. शशिकांत शिंदे यांनी घेतला विकासकामांचा आढावा

नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह तब्बल बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहराच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.

yesterday