सातारा : करंजे पेठ, सातारा येथे वरातीत नाचल्यानंतर घरी जात असताना हा कोण नवीन डॉन असे विचारात तीन युवकांनी एका युवकास मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये युवकास दगडाने मारहाण केल्याने त्याच्या डोक्यास जखम झाली असून तीन युवकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० रोजी रात्री करंजे येथे एक वरात सुरु होती. डॉल्बीचा आवाज ऐकून सूरज धनंजय पंडित (वय १७ रा. करंजे पेठ, सातारा) हा तिथे गेला. तिथे त्याचे मित्रही असल्याने त्यांच्याबरोबर तो वरातीत नाचला. वरात संपल्यानंतर मित्रांसमवेत घरी जात असताना अक्षय इंगवले (पूर्ण नाव माहिती नाही, रा. एकता कॉलनी, करंजे पेठ, सातारा) याने हा कोण नवीन डॉन आलाय असे विचारले, त्यावेळी सूरजने मागे वळून पाहिले असता त्याला अक्षय इंगवले, त्याचा भाऊ व शुभम भंडारे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
यावेळी अक्षय इंगवले याने सूरजला दगडाने डोक्यात मारल्याने तो जखमी झाला. त्यानंतर हे सर्वजण पळून गेले. याबाबत सूरज पंडीत याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन युवकांवर गुन्हा दाखल केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |