जकार्ता : एशियाडमध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूला, चायनीज तैपेईच्या ताई झऊ यिंगकडून सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. परंतु तरीही सिंधूने इतिहास रचला आहे. एशियाडमधील बॅडमिंटनच्या 56 वर्षांच्या इतिहासात रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. 1962 मध्ये आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनचा समावेश झाला होता.
भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन कोर्टवर उतरलेल्या सिंधूने पहिला गेम 13-21 असा गमावला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. या गेममध्ये सिंधूला 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाचं म्हणजे ताई झू यिंगकडूनच पराभूत झाल्याने सायना नेहवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताई झू यिंगने पहिला गेम सहज जिंकला. हा गेम तिने 21-13 अशा फरकाने जिंकला. यिंगने सामन्यात सुरुवातीपासूने वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, ज्याचा फायदा तिला झाला. यावेळी सिंधूने नेटवर फार चुका केल्या. परिणामी प्रतिस्पर्धी खेळाडूला सहजरित्या आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहला गेम 16 मिनिटांत संपला.
दुसऱ्या गेममध्ये पीव्ही सिंधूने आक्रमक सुरुवात केली. एक वेळ अशी होती की, दोन्ही खेळाडू 4-4 अशा बरोबरीत होत्या. मात्र यिंगने कमबॅक करत ब्रेकपर्यंत 7-11 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूने काऊंटर अटॅक करत काही पॉईंट्स घेतले. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. 18 मिनिटांच्या या गेममध्ये सिंधूला 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. अखेर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |