03:25am | Jan 18, 2020 |
सातारा : वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शुक्रवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्या तडफडून मेल्याची माहिती दिली. मंगल जेधेंचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. पोळ याने आनंद व्यक्त करून त्यांच्या अंगावरील सोने व रोकड लुटली, अशी साक्षही तिने दिली. दरम्यान, पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगला यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला हादरवणार्या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शुक्रवारी ते न्यायालयात उपस्थित होते. यावेळी पोळ याने मंगला यांचा खून करण्यासाठी वापरलेले इंजेक्शन, विषारी औषधाची बाटली, तसेच मंगल यांच्याकडील बॅग न्यायालयात ओळखली आहे.
गुरूवारी याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा मॅरेथॉन सुनावणी झाली. माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची साक्ष झाली. साक्ष देताना ज्योती म्हणाली, दि.16 जून 2016 रोजी संतोषने मंगल यांच्या खूनचा प्लॅन मला सांगितला होता. त्यासाठी सोने दुप्पट करून देतो असे मंगल यांना त्याने सांगितले होते. मंगल यांना त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्याकडील सर्व सोने व रोख रक्कम दीड लाख रुपये सोबत घेतले होते. पोळच्या सांगण्यावरून मी 16 रोजी पहाटे मंगला यांना माझ्या दुचाकीवरून पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणले होते. त्यानंतर लांबचा प्रवास करायचा असल्याने थकवा न येण्यासाठी इंजेक्शन देतो, असे सांगून पोळने त्याच्याकडील विषारी इंजेक्शन जेधेंना दिले. त्यानंतर त्या तडफडू लागल्यानंतर मी व पोळने त्यांचे हातपाय पकडून धरले व त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोने व त्यांच्या बॅगमधील रोख रक्कम दीड लाख रुपये काढून घेतले.
त्यानंतर मंगला या जिवंत आहेत तसेच त्या पोळकडील सोने लुटून गायब झाल्याचे भासवण्यासाठी पोळनेच त्यांचा मोबाईल माझ्याकडे दिला व पुण्याला जाण्यास सांगितले. तसेच पुण्यात गेल्यानंतर मंगला यांचा मोबाईल सुरू करून कोणाचा फोन आला तर तो घ्यायचा पण काहीही बोलायचे नाही असेही पोळने सांगितले होते. त्यानुसार ज्योतीने पुण्यात गेल्यानंतर मंगल यांचा फोन सुरू केला व त्यावर फोन आल्यावर पोळने सांगितल्याप्रमाणे बोलली नाही. त्यावेळी पोळचाही फोन आला आणि त्याने ‘मॅडम तुम्ही माझे सगळे काही घेउन गेला आहात, प्लिज माझा फोन घ्या’ असे म्हणून लागला. त्यानंतर पोळने दुपारी तीन वाजता ज्योतीला फोन करून वाईला बोलवून घेतले.
दि.30 जून 2016 रोजी पोळच्या सांगण्यावरूनच ज्योती तिच्या वडिलांना घेऊन कोल्हापूरला गेली. तिथे पोळने लिहून दिलेली एक चिठ्ठी वडिलांना वाचण्यास सांगितले, त्यावर ‘तुझे पोलीस ठाणे मे जाने की इतनी क्या जल्दी थी,’ असे लिहले होते. त्यानंतर पोळचा फोन आल्यावर ज्योतीच्या वडिलांनी चिठ्ठीवरील मजकुर वाचून फोनवर सांगितला. तो कॉल रेर्कार्ड करून पोळने मंगला यांचे अपहरण झाल्याचा बनाव केल्याचे ज्योतीने न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी दि. 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी सरकार पक्षावतीने उर्वरीत साक्ष होणार असून त्यानंतर बचाव पक्षाच्यावतीने उलट तपासणी होणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |