वाई : गड- किल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण श्री छ. उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान निवडणुका आल्या की चारित्र्यहनन करणे हे किळसवाणे असून गड-किल्ल्यांवर डान्सबार, बार उघडा असे म्हणण्याचा विचार मनात येण्यापेक्षा मेलेलं बरं, अशी प्रतिक्रियाही उदयनराजे यांनी वाई येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
गड , किल्ले ही छत्रपती शिवरायांची आठवण व पराक्रमाची प्रतीक असून गड - किल्ल्यांचे संवर्धन व्हावे,असे माझे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केले आहे. गड किल्ल्याबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा काहींचा प्रयत्न होत आहे. गड, किल्ले पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्याची व्यवस्था असावी यासाठी याठिकाणी काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने भूमिका मांडली.त्या भूमिकेनुसार गड-किल्ल्यांच्या त्याला निवासाची सोय असावी पायथ्याशी राहण्याची व्यवस्था असावी, गडावर जाण्यासाठी रोपवे असावा, अशी भूमिका मी मांडली होती. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी जे बोललो ते बोललो मात्र मी जे बोललोच नाही त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. गड, किल्यावर डान्सबार, बार उघडा असे म्हणण्याचा विचार जरी मनात आला तर त्यापेक्षा मेलेलं बर, असेही उदयनराजे म्हणाले.
मी काही दिवसांपूर्वी एका दैनिकाला मुलाखत दिली होती. त्यावेळी मी गड, किल्याबाबत माझी भूमिका मांडली होती. जे मी बोललो नाही त्याचे खापर माझ्यावर फुटणार असेल तर बरोबर नाही.ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती होणार आहे.मी संकुचित बुद्धीचा नसून निवडणूक आली की माझ्या चारित्र्यहननाचा काहीजणांकडून कट शिजवला जातो, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात गुरुवारी सभा होत असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडणार असून जिल्ह्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उदयनराजे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सातारा जिल्ह्यासाठी तुम्ही काय केले ते सांगा असे आव्हानही त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |