नागपूर : येत्या शनिवारपासून (ता.21) दुधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय दूध उत्पादकांना दर वाढवून मिळण्यासाठी केंद्र शासनाने दूध भुकटीसाठी 20 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यासोबत, दुग्धजन्य पदार्थ व दूध पावडरवर 40 टक्के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दूध दर वाढवून देण्यासाठी राज्य शासनाने दूध भुकटी उत्पादकांसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान जाहीर केले आहे. तसेच मध्यान्ह भोजन, तसेच इतर शासकीय योजनांत भुकटी देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे 21 जुलैपासून 3 रुपये तर नंतर 2 रुपये वाढविण्याचे काही खाजगी, सरकारी दूध संघांनी जाहीर केले आहे.
दुसऱ्या बाजूला मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. त्याचा दूध संकलनावर मोठा परिणाम झाला असून दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यकर्ते हल्ले करत आहेत. यासंबंधाने विधिमंडळात तीन वेळा चर्चा झाली आहे. मात्र निर्णय झाला नव्हता. काही निर्णय केंद्र सरकारशी संबंधित होते. आज केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यासंबंधाने निर्णय घेण्यासाठी नागपूर अधिवेशनात आले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात ही बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर माहिती देताना गडकरी म्हणाले, दुग्धजन्य पदार्थ आणि भुकटीवर 40 टक्के आयातशुल्क लावण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र शासन भुकटी तयार करणाऱ्यांना 20 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. मध्यान्ह योजनेत दूध वितरण करण्यात येणार आहे. आदिवासींच्या योजनेतही दूध दिले जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |