RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास

23 July 2019 at 01:39

श्रीहरिकोटा: जगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' बाहुबली रॉकेटच्या मदतीने आज अखेर अंतराळात झेपावलं. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी 'चांद्रयान-२' चे प्रक्षेपण करण्यात आले. 

पृथ्वीच्या चार प्रदक्षिणा मारल्यानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल होणार आहे. दरम्यान इस्त्रोने शनिवारी चांद्रयान-2ची रंगीत तालीम केली होती. यातील अडचणी, त्रुटी पूर्ण केल्यानंतर सोमवारी चांद्रयान अवकाशात झेपावले. लॉन्चिंगच्या 17 मिनिटांतच योग्य कक्षेत प्रवेश केला आणि यशस्वी वाटचाल सुरू झाली. चांद्रयानाचे प्रक्षेपण यशस्वी ठरताच इस्रोच्या संशोधकांनी एकच जल्लोष केला. आता पुढील 23 दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच राहणार आहे.

जीएसएलव्ही मार्क -३द्वारे चांद्रयान २चे यशस्वी प्रक्षेपण झालं. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही मिनिटांतच यान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचलं, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. चांद्रयान २मधील तांत्रिक समस्या दूर करून हे यान अंतराळात पाठवलं. अपेक्षेप्रमाणे चांद्रयान २ चे प्रक्षेपण उत्तम झालंय. इस्रोच्या टीमनं प्रचंड मेहनत घेतली. शास्त्रज्ञांच्या टीमला सलाम करतो, असंही सिवन म्हणाले. 

15 जुलै रोजी चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार होते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. इस्रोने एका आठवड्यात चांद्रयान-2 मधील सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या. ऑर्बिटरसोबत लँडर(विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान) सोबत पाठवण्याचे भारताचे पहिले मिशन आहे. या मिशनवर 978 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

 

माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

24 August 2019 at 16:23

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18