कराड : मोबाईलला रिचार्ज मारण्यासाठी दिलेल्या नंबरचा गैरवापर करून दोन महिलांना वारंवार अश्लिल एसएमएस पाठवल्याप्रकरणी शहरातील मंगळवार पेठेतील गणेश झेरॉक्स ॲण्ड रिचार्ज सेंटर दुकानाच्या मालकाविरूध्द शहर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे. गणेश वसंतराव दसवंत रा. मंगळवार पेठ कराड असे या गुन्ह्यातील संशयीताचे नाव आहे.
याबाबत पिडीत महिलेने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. १९ एप्रिल रोजी पिडीत महिला तिच्याकडील मोबाईलला रिचार्ज मारण्यासाठी गणेश झेरॉक्स ॲण्ड रिचार्ज सेंटर दुकानात गेली होती. रिचार्ज मारून ती घरी गेल्यानंतर तिच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून अश्लिल एसएमएस येवू लागले. तिने हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने एसएमएस येणारा नंबर कोणाचा आहे, हे बघण्यासाठी गणेश रिचार्ज सेंटरमध्ये जावून तिच्या मोबाईलवर रिचार्ज मारला. त्यानंतर मैत्रिणीच्या मोबाईलवरही दुसऱ्याच अनोळखी नंबरवरून अश्लिल एसएमएस येवू लागले. हे एसएमएस गणेश रिचार्ज सेंटरचा मालक गणेश दसवंत हाच पाठवत असल्याची दोघांची खात्री झाल्यानंतर पिडीत महिलेने याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गणेश दसवंत या संशयीताविरूध्द पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |