बेंगळुरू : अनेक दिवसांपासून सुरू असलेले कर्नाटकातील राजकीय नाट्य अखेर आज संपले, बहुमत चाचणीत काँग्रेस- जेडीएसचं सरकार कोसळल आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावावर अखेर आज मतदान झालं. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात १०५ मतं पडल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामींचे सरकार गडगडले. यानंतर कुमारस्वामींनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. तत्पूर्वी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या भाषणानंतर विधानसभेत विश्वासमतावर मतदान व आमदारांची मोजणी झाली होती.
भाजपचे विधीमंडळ पक्षनेते बी. एस. येडियुरप्पा हे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या सर्व आमदारांची बैठक आता होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आम्ही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहोत, असे येडियुरप्पा यांनी माध्यमांना सांगितले. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनीही कर्नाटकात भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती दिली. कर्नाटकात येडियुरप्पा हेच मुख्यमंत्रिपदाचे आमचे उमेदवार आहेत. त्याबाबत केंद्रीय नेतृत्वाच्या मनात कोणतंही दुमत नाही, असेही गौडा यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, विधानसभेत बहुमत गमावल्यानंतर कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे.
कुमारस्वामी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे स्पष्ट निर्देश पक्षाने दिलेले असतानाही विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी सभागृहात गैरहजर राहणारे बसपा आमदार एन. महेश यांची मायावती यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याने महेश यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. कर्नाटक विधानसभेत महेश हे बसपाचे एकमेव आमदार होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |