03:29am | Aug 19, 2018 |
औरंगाबाद : नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआरने मोठी कारवाई केली आहे. नरेंद्र दाभोळकरांवर गोळी झाडणार्याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबादमधून सचिन अंधुरेला सीबीआरने ताब्यात घेतले आहे. तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर हत्या प्रकरणात दुसर्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
औरंगाबाद येथून 14 तारखेला रात्री सचिन अंधुरे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरेला आई वडील नसून एक मोठा भाऊ आहे. तो विवाहित असून त्याला 2 मुले आहेत. औरंगाबादेतील रोजा बझार भागातील तो रहिवासी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता कुठे त्यांच्या मारेकर्यांना शोधण्यात सीबीआयला यश आले आहे. दरम्यान, सीबीआय आता आरोपीची कसून चौकशी करत आहे. त्यामुळे यात आणखी कोणाचा हात आहे का आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सगळे करण्यात आले? याचाही आता लवकरच उलगडा होईल का, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नरेंद्र दाभोलकरांनी राज्यभर फिरून अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचे केंद्र होते पुणे. पुण्यातून निघणार्या साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ राबवली. दुर्दैव म्हणजे याच पुण्यात त्यांचा खून झाला. डॉ. नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेतील बालंगधर्व रंगमंदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्या पुलावरून जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक 25 ते 30 वर्षे वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडर या दुचाकीवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी दोघेही हल्लेखोर बाईकवर बसून परागंदा झाले.
तो पहिला कोण?
एटीएसच्या ताब्यात असलेल्या वैभव राऊत, शरद कळस्कर व सुधन्वा गोंधळेकर या तिघांची आज पोलीस कोठडी संपली असल्याने त्यांना न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आले. याबाबत न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी वाढवून ती 28 ऑगस्टपर्यंत दिली. या तिघांपैकी एकाने आपण डॉ. दाभोलकरांच्या हत्त्या प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली. त्याने त्याच्याबरोबर सचिन अंदुरे याचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यामुळे या पहिल्या आरोपीच्या कबुलीनाम्यावरुन अंदुरे यास चौकशीसाठी बोलविण्यात आले. अंदुरे यानेही डॉ. दाभोलकर हत्त्या प्रकरणाशी संलग्न अशीच माहिती दिली असून अंदुरेला अटक करण्यात आले आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |