02:29am | Sep 19, 2019 |
पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक हित साधायचे असेल तर त्यासाठी पर्यटन विकास हेच खरे माध्यम आहे. येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा सकारात्मक उपयोग आणि भौगोलिक व नैसर्गिक आपत्तीवर मात करून समृध्दी आणण्यासाठी येणाऱ्या काळात नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्प विकसित करणे हे आपले ध्येय आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघातील जनतेचे स्वप्न असलेला हा प्रकल्प भविष्यकाळात आपण यशस्वीरित्या पुर्णत्वाला नेणार आहे. यातूनच येथे सार्वत्रिक नंदनवन साधले जाणार असल्याने आता हा प्रकल्प वाट्टेल ते झाले तरी तडीस नेणार असल्याचा विश्वास युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे मंत्री असताना त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन खाते होते. तर राज्य रस्ते विकास महामंडळाचे ते त्यावेळी अध्यक्षही होते. आघाडी शासनाच्या काळात त्यांनी या प्रकल्पाचा आराखडा तयार केला. यातूनच पाटणसह जावली, सातारा तालुक्यातील एकूण 52 गावांचा यात समावेश करण्यात आला. यात सर्वाधिक 29 गावे ही पाटण तालुक्यातील आहेत. स्वाभाविकच पर्यटन विकास व वाढ तसेच सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार या भावनेतून शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची नियुक्तीही केली होती. दुर्दैवाने त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पाटणकरांचा पराभव झाला. केवळ राजकीय आकसापोटी या महाबलाढ्य प्रकल्पाला विरोध झाला आणि दुर्दैवाने तो प्रकल्प बारगळला.
वास्तविक या प्रकल्पाला विरोध करण्याचे विरोधकांना काहीच कारण नव्हते. मात्र येथील स्थानिक जनता विकासाच्या प्रवाहात येवूच नये या कुटील मानसिकतेपोटी याला विरोध झाला आणि हजारोंचे स्वप्न असलेला हा प्रकल्प त्या नंतर होवू शकला नाही. यातून कधीही न भरून येणारे नुकसानही झाले. सुदैवाने पाटणकरांनी त्याकाळी दाखवलेली दूरदृष्टी व पर्यटन विकास हा या राज्य शासनाला उशीरा का होईना पण पटला आणि पुन्हा त्यांनी नव्याने याची अधिसूचना काढली आहे. निश्चितच या प्रकल्पामुळे येथे सार्वत्रिक सुविधा होणार आहेत. रस्ते, पाणी, वीज आदी मुलभूत सुविधा तर मिळणार आहेतच याशिवाय येथे साडेतीन हजाराहून अधिक रोजगार व त्याचपटीत व्यवसाय निर्मितीही होणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक नापीक, पडीक जमिनींना सोन्याचा भाव मिळेल. बाहेरच्या राज्यासह परराज्यातील गुंतवणूकदार येथे येवून पर्यटन प्रकल्प उभारतील. पाचगणी, महाबळेश्वर आदी सारख्या ठिकाणी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय राहिवाशी शाळा, कॉलेज येथे येतील. पर्यावरण पुरक अशी डिस्नी लॅन्ड, इमॅजीका असले अत्याधुनिक वॉटर स्पोर्ट्स, पंचतारांकित हॉटेल्स, रिसॉर्ट, अत्याधुनिक दवाखाने, प्रकल्प येथे यानिमित्ताने येतील. स्थानिकांनाही आपापले व्यवसाय, उद्योग सुरू करता येतील. याशिवाय मोठ्या प्रमाणावर नोकरयांची संधीही यातून उपलब्ध होणार आहे. जागतीक वनौषधी लागवड, संवर्धन वेगवेगळ्या कलाकृती ,वस्तू बनविण्याचे कारखाने , कृषी पर्यटन, महिलांसाठी गृहउद्योग आदी नवनवीन प्रकल्प यातून साकारले जातील. शिवाय मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, निसर्ग साधन संपत्ती रक्षण व संवर्धन होईल. निश्चितच यामुळे येथे जिल्हा, राज्य, देशच नव्हे तर परदेशातील पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतील. दैनंदिन हजारो पर्यटकांची हजेरी लागल्याने स्थानिकच नव्हे तर अगदी पाटण, कोयना, मल्हारपेठ, मोरगिरी आदी सर्वच स्थानिक बाजारपेठांनाही पुन्हा अच्छे दिन येतील. या सर्व गोष्टींचा विचार करून कोणताही प्रकल्प राबविताना त्यासाठी सकारात्मक प्रयत्न, दूरदृष्टी व नियोजन याची गरज असते. सुदैवाने आजवर आपण जे प्रकल्प राबविले ते यशस्वी केले त्यामुळे आता नेहमीच आपल्या चांगल्या प्रकल्पात खोडा घालणारयांनी कितीही नकारात्मक प्रयत्न केले तरीही विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांच्या स्वप्नातील हा नवीन महाबळेश्वर प्रकल्प आपण वाट्टेल त्या परिस्थितीत साकार करणारच, असा विश्वासही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |