01:48am | Nov 14, 2019 |
कराड : विधानसभा निवडणुकीसाठी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा वापर करण्यात आला. प्रशस्त इमारतीतून दोन विधानसभा मतदारसंघाच्या कामाची सूत्रे तेथून हलवता येणे शक्य झाले. मात्र, निवडणुका संपल्या आता या इमारतीला उद्घाटनाबरोबरच प्रशासकीय कार्यालये सुरु होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. प्रांत, तहसीलसह अन्य शासकीय कार्यालये या एकाच इमारतीत येणार असल्याने लोकांची मोठी सोय होणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासकीय इमारतीच्या कामाला मंजुरी देत निधी मंजूर केला. त्यानंतर 2014 मध्ये या इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यांनतर राज्यात सत्तांतर होरुन भाजप व शिवसेना युती सत्तेत आली. गेल्या काही दिवसांपासून इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधूमीमुळे त्याच्या उद्घाटकडे दुलक्ष झाल्याची स्थिती होती. वास्तविक इमारतीचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले. मात्र फर्निचर व इलेक्ट्रिकल कामाची निविदा विलंबाने निघाल्याने काम लांबले गेल्याची चर्चा आहे. त्यातूनही इमारतीचे काम पूर्णत्वास आले. विधानसभा निवडणुकीचे कामकाज याच इमारतीतून करण्याची परवानगी घेत तेथून निवडणूक काम सुरु केले. त्यानुसार नव्याने होणार्या प्रांत कार्यालयात कराड दक्षिण विधानसभा व तहसील कार्यालयात कराड प्रांताधिकारी उत्तम दिघे हे कराड दक्षिणचे निवडणूक अधिकारी असल्याने व तहसीलदार अमरदीप वाकडे कराड उत्तरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे उद्घाटनापूर्वीच दोघांनाही कक्षाचा ताबा घेण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली. सध्या निवडणुकीचे कामकाज संपले असले, तरी पूर्वीप्रमाणे जुन्या ठिकाणीच प्रांत व तहसील कार्यालयाचे कामकाज सुरु आहे. मात्र, निवडणुक काळात सुमारे महिनाभर या इमारतीत वावरलेल्या अधिकार्यांनाही जुन्या ठिकाणी मन रमणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच पूर्णत्वास आलेल्या इमारतीचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात कामाला केव्हाच मुहूर्त मिळणार याकडे शहरासह तालुक्याचे लक्षस लागुन आहे. या इमारतीत केवळ प्रांत व तहसील कार्यालय न राहता तेथे अन्य शासकीय कार्यालये आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची सुविधा असल्याने तालुक्यातील नागरिकांसाठी एकाच इमारतीत सर्व शासकीय कार्यालये सहजरीत्या उपलब्ध होणार आहेत.
मात्र, या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या सुरु असलेल्या सरकार स्थापनेच्या घोळानंतर या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. मा, तोपर्यंत काही कार्यांलयांनी जुन्या कार्यालयातील सामानांची हलवाहलव सुरु करुन ती नव्या कार्यालयात आणण्याचे काम सुरु झाल्याचेही समजते. त्यामुळे डिसेंबर पूर्वी की नव्या वर्षात नवीन इमारतीत शासकीय कार्यालयांचे स्थलांतर होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |