सातारा : जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे यांना सतारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व समाज कल्याण विभागाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित समारंभात सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या सह सर्व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दिनकर झिंब्रे यांनी गेल्या ४० वर्षात केलेल्या सामाजिक न्याय व प्रबोधनाचे क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या वैचारिक प्रबोधनाचे क्षेत्रात मौलिक भूमिका बजावणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीच्या स्थापनेपासून २५ वर्षे कार्यवाह म्हणून त्यांनी कार्य केले असून राज्याच्या विविध ठिकाणी महत्वपुर्ण अशा१५ विचार वेध संमेलनाचे तसेच १५ साहित्य चर्चा, पत्रकार- कार्यशाळा, व्याख्याने, शिबिरांचे आयोजनात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक उपाध्यक्ष या नात्याने म.फुले स्मृती दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधी मध्ये थोरांच्या स्मृती व्याख्यानमाला अखंड ३० वर्षे व महामाता भीमाई पुरस्काराने महाराष्ट्रतील विविध क्षेत्रातील मौलिक योगदान देणाऱ्या महिलांच्या गौरवाचा २०वर्षांपासूनच्या उपक्रमांकाचे अध्वर्यू म्हणून ते कार्यरत आहेत.
एकता शिक्षण संस्थेचे १९७५ ते१९९७ पर्यंत कार्यवाह म्हणून काम.
समाजवादी युवक दल या संघटनेच्या माध्यमातून १९७३ ते १९८३ पर्यंत, त्यांनंतर समता आंदोलन महाराष्ट्र संघटनेचे १९८३ ते १९८८ पर्यंत सामाजिक चळवळीत एक गाव एक पाणवठा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात तुरुंगवास, दलित अत्याचार विरोधी तसेच मंडल आयोग, आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग
पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी जिल्ह्यात आपला ठसा उमटवला असून पुणे विभागाचा दर्पण पुरस्कार डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे. सातारा जि.प. पुरस्कारा बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |