11:56pm | Jul 25, 2018 |
कराड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज बुधवारी (दि. २५) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. आजपासून सातारा जिल्ह्यात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य बाजारपेठेसह शहरातील व्यापारी, दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला शंभर टक्के पाठिंबा दर्शविला. कोल्हापूर नाक्यावर महामार्ग रोखण्यात आला, तर अनेक ठिकाणी टायर पेटविण्यात आले.
मराठा समाजाच्या वतीने 'कराड बंद'च्या पार्श्वभूमीवर शहरातून पदयात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर युवकांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. भगव्या टोप्या परिधान करून हातात झेंडे घेऊन ’एक मराठा, लाख मराठा’ घोषणा देत हजारो युवक रॅलीत सहभागी झाले. या वेळी दत्त चौकातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून मुख्य बाजारपेठमार्गे विद्यानगर परिसरातून बसस्थानकमार्गे रॅली कार्वे नाका तसेच मलकापूर येथून कोल्हापूर नाका येथे परतली. या वेळी व्यापारी, दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
मोटारसायकल रॅली कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. या वेळी युवकांनी पुणे-बंगळूर रस्त्यावरच ठाण मांडत घोषणाबाजी केली आणि महामार्ग रोखून धरला. महामार्गाच्या दुसऱ्या बाजूस पंकज हॉटेलसमोर उड्डाणपुलावर युवकांनी एसटी बसवर दगडफेक केली. या घटनांमुळे महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
कराड शहर परिसरात आंदोलकांनी ठिकठिकाणी टायर पेटविले. कराड-विटा मार्गावर ओगलेवाडी येथे सकाळी रस्त्यावरच टायर पेटविले. त्याचबरोबर वारुंजी फाटा, कराड-मसूर मार्गावर दत्तनगर येथे पेटते टायर रस्त्यावर टाकण्यात आले. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
कराड बसस्थानकासमोर असणाऱ्या 'अलंकार' हॉटेलवर आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्ये हॉटेलच्या काचा फुटल्या. त्यामुळे बसस्थानकासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
येथील बाजार समितीत व्यापाऱ्यांचे टेम्पोमध्ये माल भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी आंदोलक बाजार समितीत आले आणि व्यापाऱ्यांच्या दुकानाचे शटर डाऊन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी दुकान चालू ठेवल्याने आंदोलक संतप्त झाले आणि टेम्पो हाकलून लावला.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |