फलटण : वडले, ता. फलटण येथील शेतात झाडे लावण्याच्या कारणावरुन वाद होऊन झालेल्या भांडणात सख्ख्या चुलत भावांनी आपल्याच चुलत भावाचा खून केला असल्याची घटना रविवारी घडली. बाळकृष्ण विठ्ठल सोनवलकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 6 जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कांताबाई बाळकृष्ण सोनवलकर यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार त्यांचे पती बाळकृष्ण विट्ठल सोनवलकर (वय 35) हे घराशेजारील झाडाखाली रविवारी दि. 3 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान झाडांसाठी खड्डे काढत असताना चुलत भावांच्यात भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर नंतर मारहाणीत झाले. यावरून बाळकृष्ण सोनवलकर यांचे चुलत भाऊ गणेश दशरथ सोनवलकर, दत्तू दशरथ सोनवलकर, शिवाजी दशरथ सोनवलकर, चुलत जाऊ वैशाली दत्तू सोनवलकर, स्वाती शिवाजी सोनवलकर, रेश्मा गणेश सोनवलकर सर्व रा. वडले ता. फलटण यांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये बाळकृष्ण सोनवलकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला असून ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी अधिक तपास करत आहेत. संशयित लोकांना ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पोलीस वडले व परिसरात दाखल झाले असून या घटनेनंतर वडले गावात एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |