सातारा : हल्लीची मुले छोट्या-छोट्या कारणावरूनही अगदी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. खटाव तालुक्यातील नडवळ येथील एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलाने नवीन मोबाईल घेत नाहीत म्हणून चक्क विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेने भेदरलेल्या नातेवाईकांनी त्याला तत्काळ साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सुमित संजय कुकळे असे विषारी औषध प्राशन केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून सुमितने नवीन मोबाईल घेण्यासाठी घरातल्यांकडे हट्ट धरला होता.
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो अंथरूनातून उठला. त्यानंतर अचानक त्याने साडेसात वाजता विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्याच्या घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तत्काळ नजिकच्या दवाखान्यात नेण्यात आले.
त्यानंतर तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.
नवीन मोबाईल घेण्याच्या कारणावरून सुमितने विष प्राशन केले असल्याचा जबाब त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील पोलिसांना दिला आहे. मात्र, आमची कोणाबाबतही तक्रार नाही, असेही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |