बंगळूर : महाप्रसादातून विषबाधा होऊन 12 भाविकांना जीव गमवावा लागल्याची घटना चामराजनगरातील हनूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी घडली. सुमारे 70 जण अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. प्रसादात कीटकनाशकाचा अंश आढळून आला आहे. हा घातपात असण्याची शक्यता असून, दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुळवाडी (ता. हनूर) येथील किच्चुगुत्ती मारम्मा मंदिरात गोपूर उद्घाटनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी महाप्रसादानंतर भाविकांना उलटी, जुलाब, पोटात मळमळणे असा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळपर्यंत मृतांच्या आणि अस्वस्थांच्या संख्येत वाढ होत गेली.
मंदिर आणि परिसरातील जमीन तेथील व्यवस्थापनाच्या नावावर आहे. ती आपल्या नावावर करण्यासाठी दोघा संशयितांनी व्यवस्थापनासोबत वाद घातला होता. गोपूर बांधकामासाठी त्यांनी आडकाठी आणल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे.
गोपीयम्मा, कृष्ण नायक, अनिता पापण्णा, अण्णय्यप्पा, शांतराजू, दोड्डमादय्या, राचय्या यांच्यासह बाराजण मृत्युमुखी पडले. याप्रकरणी चिन्नप्पी आणि
मादेश यांना अटक करण्यात आली आहे. के. आर. रुग्णालयातील डॉ. राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नामध्ये कीटकनाशकाचा अंश आढळून आला आहे.
पाच लाखांची मदत
सायंकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी तातडीने अधिकार्यांची बैठक घेतली. मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |