02:14am | Nov 30, 2019 |
कराड : अतिवृष्टीमुळे टेंभू योजनेसह कृष्णा कालव्याचा सेवा रस्ता खचून कालव्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृष्णा कालव्याचे त्यात सुमारे 14 कोटींचे नुकसान होऊन त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार निधी मिळाल्याने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येते.
मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीवेळी कालव्यालगतच्या अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अतिक्रमणाचा विषय कळीचा मुद्दा ठरणार, की त्यातून समन्वयातून मार्ग निघणार याकडे शेतकर्यांचे लक्ष आहे.
खोडशी येथील ब्रिटिशकालीन वळण बंधार्यावर कृष्णा कालवा आहे. कराडसह सांगली जिल्हयातील तीन तालुक्यांना हा कालवा वरदायी आहे. 86 किलो.मी. लांबीच्या या कालव्यातून मिळणार्या पाण्यामुळे सिंचनासह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते. मात्र, जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीवेळी सैदापूरपासून गोवारे व परिसरातील कालव्याचा सेवा रस्ता मोठया प्रमाणात खचला. त्यामुळे सैदापूर, गोवारे, चौंडेश्वरीनगर व लगतच्या गावाच्या कालव्यालगतच्या वसाहतीच्या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला. काही ठिकाणी मोटारसायकल, सायकल ये. जा करण्यापुरता रस्ता आहे. त्यामुळे चारचाकी वाहने असो किंवा रिक्षा असो तेथून ने.आण करणे अवघड बनले आहे. रुग्णांना अथवा वृध्दांना नेण्याची मोठी गैरसोय होत आहे. अतिवृष्टीनंतर टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन रेकृीयार यांनी नुकसानीचा अहवाल तयार करुन वरिष्ठांना पाठवला आहे. त्यात कालव्याचे सुमारे 14 कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यात खोडशीपासून सुमारे साडेतीने किलोमीटर व त्याच्या पुढच्या काही भागांचे नुकसान मोठया प्रमाणात झाले असून, त्यासाठी 13 कोटी 50 लाखांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय अन्य ठिकाणच्या नुकसानीसाठी 45 लाखांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. या कामांना शासनस्तरावर मंजुरी मिळाल्याने निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे कृष्णा कालव्याचे उपअभियंता लालासाहेब मोरे यांनी सांगितले. दरम्यान, कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाल्यावर कालव्यालगतच्या अतिक्रमणाचा सातत्याने भिजत असणारा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. अनेकदा कालव्यालगतच्या अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण होतो. माात्र, अवघड जागचे दुखणे असल्याने लोकांशी वाईटपणा कोण घ्यायचे या प्रश्नातून तो तसाच राहतो. अधिकारीही दोन ते तीन वर्षे काम करताना लोकांशी वाद घालून संघर्ष करण्यापेक्षा या अतिक्रमणाकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अतिक्रमणाचा प्रश्न भिजत पडला आहे. त्यावर कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या निमित्ताने पुन्हा अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यास कृष्णा खोरे कसे तोंड देणार की पुन्हा अतिक्रमणाचा प्रश्न भिजत पडणार याकडे लक्ष लागून आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |