07:56pm | May 29, 2018 |
सातारा: गेले अनेक वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादीच्या श्रेयवादामधे अडकलेले साताऱ्यातील शासकीय महाविद्यालयासाठी खावली ता. सातारा येथील जागा मिळाली आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत कृष्णा खोरे महामंडळाचे सुमारे 25 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा साताऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय यानिमित्ताने मार्गी लागलेला आहे.
सातारा जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे अशी मागणी गेले अनेक वर्ष साताऱ्यातील जनतेचे होती. त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. मात्र ते उभारायचे कुठे या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कलगीतुऱ्यात मेडिकल कॉलेज बासनात गुंडाळले गेले, स्वतःला भूमिपुत्र म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांना जे जमले नाही ते विदर्भातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवले आहे.
सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारच्या मेडिकल कॉलेज बाबतीत आग्रही होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा येथे आणून मेडिकल कॉलेज बाबत गार्हाणे मांडले होते. सातारा जिल्ह्याच्या विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती आग्रही आहेत याबाबतची पोच-पावती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजच्या 25 एकर जमिनीच्या निमित्ताने दिलेली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असूनसुद्धा मेडिकल कॉलेजच्या जागेबाबतचा तिडा त्यांना सोडवता आला नव्हता. जलसंपदा खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे जमीन हस्तांतरणाबाबत या प्रकरणात राष्ट्रवादीने प्रथम पासूनच 'कोलदांडा' घातला होता. सातारा शहरा लगत असणाऱ्या कृष्णा नगरची जागा जलसंपदा खात्याची असली तरीही या जागेचे मूळ मालक राज्य सरकारचा आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून आज राज्य सरकारने मंत्री मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सातारच्या मेडिकल कॉलेजच्या जागेचा तिढा सोडवलेला आहे.
मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संदर्भातील प्रश्न निकाली निघाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील गोरगरिबांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळणार आहेत. लवकरच हे मेडिकल कॉलेज उभारले जाईल, मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे सातारच्या इतिहासातील एक सुवर्णपान लिहिले गेले आहे. अशी प्रतिक्रिया सातारकरांनी दिलेले आहे.
महाराज वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या तीनही मागण्या मान्य :
सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात आले होते. यावेळी खा. उदयनराजे यांनी सातारा येथील मेडिकल कॉलेज, सातारा शहराची हद्द्वाढ, आणि किल्ले अजिंक्यतारा संवर्धनासाठी विकास निधीची मागणी केली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. उदयनराजे यांना उद्देशून 'महाराज वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या तीनही मान्य' असे आश्वासन दिले होते. दरम्यान यातील आज एक मागणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्यामुळे खा. उदयनराजेंची कॉलर खऱ्या अर्थाने 'टाईट' झाली आहे. मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने खा. उदयनराजेंची राष्ट्रवादीला चेक-मेट दिला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |