02:31am | Jun 30, 2019 |
सातारा : ट्रकचालकाला मारहाण करून लूटमार करणार्या तीन संशयितांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या दोन तासांमध्ये जेरबंद केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की एक ट्रक चालक कोईमतूर येथून वाढे फाटा मार्गे पुणे येथे बी.ई.एम कँपनीचे आर्मीचे साहित्य घेऊन जात होता. ट्रक चालकाने विश्रांतीसाठी वर डिझेल भरण्यासाठी ट्रक पाटखळ माथा, ता. सातारा येथील भूमिका पेट्रोल पंप येथे शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान उभा केला असता 3 अनोळखी इसमांनी ट्रक चालकाला तुझी बिल्टी कुठे आहे. तू चोरीचे सामान घेऊन चालला आहे. असे सांगून ट्रकमध्ये चढुन त्यास दमदाटी, मारहाण करून त्याच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी डीबी पथकाला संशयितांना जेरबंद करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलीस नाईक राहुल राऊत, पोलीस हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संदीप कुंभार, रमेश चव्हाण यांनी पाटखळ माथा परिसरामध्ये संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयितांच्या मिळालेल्या वर्णनानुसार एका अल्पवयीन बालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी रोहित प्रकाश मोरे ( वय 28) रा. कण्हेर, ता. सातारा, दयानंद सुदाम घाडगे ( वय 25) रा. बसाप्पाचीवाडी यांच्यासह एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले.
100 नंबरमुळे तपासाला गती..
ट्रक चालकाला लुटून चोरटे पसार झाल्यानंतर चालकाने लगेच 100 नंबरला रात्री फोन केला. पोलिस मुख्यलायात नाईट द्युटीला असणारे पोलिसांनी तालुका पोलिस ठाणे व पीसीआर ला फोन करून घटनेची माहिती दिली. कँट्रोल रूम मधील दोन फोन मुळे रात्र गस्त ला असणारे पोलिस अलर्ट झाले. अवघ्या काही तासात तपासाची चक्रे गतिमान झाली व लुटमार करणारे पोलिसांच्या तावडीत सापडले. दरम्यान, यामुळे 100 नंबर चे महत्व अधोरेखित झाले.
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |