कराड : आपआपसातील मतभेद विसरून गावामधील विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हा, आणि ऐक्य वाढवावे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी हणबरवाडी ता.कराड येथे केले.
हणबरवाडी (ता.कराड) येथे आमदार बाळासाहेब पाटील यांचे निधीतून व प्रयत्नाने पूर्ण झालेल्या साकव पूलाचे उद्घाटन व डोंगरी विकास निधीतून अंगणवाडी इमारत पायाभरणी व स्थानिक विकास निधीतून अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे आदि कामाचे भूमीपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य मानसिंगराव जगदाळे होते.
यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या मतदारसंघातील प्रत्येक गाव बागायती झाले पाहिजे हि इच्छा मनाशी बाळगून आदरणीय स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी कारखान्याच्या माध्यमातून अनेक सहकारी तत्वावरील पाणी पुरवठा संस्थांची यशस्वी उभारणी केली, मसूरच्या पुर्वेकडील भागाला श्वास्वत पाणी पुरवठा होण्यासाठी या विभागाला नवसंजीवनी देणारा हणबरवाडी, धनगरवाडी हा महत्वकांक्षी प्रकल्प उभा करण्यासाठी सदैव शासन स्तरावर प्रयत्न केले. हि योजना तातडीने पुर्णत्वास येण्यासाठी आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब आणि त्यांचेनंतर आपण मला विधानसभा सदस्य म्हणून दिलेल्या संधीच्या रूपाने मी हि शासन स्तरावर प्रयत्न केले. या विभागातील शेतकर्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आघाडी शासनाच्या काळात या योजनेला टोकन अमाऊंट उपलब्ध करून घेतली आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते समारंभ पुर्वक योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तद्नंतरच्या काळात राज्यात शेतकरी विरोधी सरकार सत्तेत आले, त्यामुळे निधीअभावी योजनेचे काम प्रलंबीत राहीले आहे. तथापि, लोकप्रतिनिधी या नात्याने लवकरात लवकर योजना पुर्ण होण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. सन 1999 साली आरफळ कॅनॉलवरून पाणी सोडलेनंतर खर्या अर्थाने हा भाग पाण्याखाली येवून लोकांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. सह्याद्रि कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांना न्याय देणेस कटीबध्द आहे, असे सांगून सहकार टिकणेसाठी सह्याद्रिच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सद्या सत्तेत असलेल्या भाजप - सेना नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही, सत्तेत राहून एकमेकांवर सतत टिका टिप्पणी करीत असल्यामुळे प्रशासनावर त्याचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही, त्यामुळे प्रशासन कमकुवत झाले आहे, दुष्काळी परिस्थिती असताना त्याचे गांभीर्य सरकारला नाही, मोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल सूरू आहे, अशा प्रवृत्तीपासून सावध रहावे, असे सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून मानसिंगराव जगदाळे म्हणाले की, हणबरवाडी-धनगरवाडी योजनेला निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी सातत्याने मागणी करून योजनांचे अस्तीत्व टिकवले असून, निव्वळ थापा मारणार्यांपासून सावध रहावे. तसेच या विभागाने नेहमी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी उभे राहून साथ केली आहे, यापुढील काळातही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन केले. सुत्रसंचालन व्यंकटराव शेडगे यांनी केले, प्रास्तावीक प्रकाश पवार यांनी केले. याप्रसंगी कराड पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, नरेश माने यांची भाषणे झाली. आभार व्ही. एस. कदम यांनी मानले.
कार्यक्रमास कराड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.शालन माळी, शरद चव्हाण, संजय चव्हाण, बाळकृष्ण ढेरे, श्रीरंग शेडगे, माजी सरपंच अरूण शेडगे, सत्यवान शेडगे, जगन्नाथ घाडगे, शंकर पालेकर, प्रकाश देसाई, हणमंत शेडगे, हणमंत पवार, सचिन पवार, मधुकर शेडगे, बळीराम शेडगे, संजय पवार, शंकर शेडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धुमाळ, जि.प.बांधकाम विभागाचे उपअभियंता शिंदे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |