01:33am | Nov 25, 2018 |
कराड : राजकीय हितशत्रूंनी निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन पद्धतीचा गैरवापर करून मलकापूरातील संभाव्य कॉंग्रेसच्या उमेदवारांची व मतदारांची नावे वगळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संगणकाचा गैरवापर करून नागरीकांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेणार्या प्रवृत्ती विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवणार असून याप्रकरणी सोमवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र यादव, राजेंद्र माने यांच्यासह ज्यांची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आलेले नागरिक उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील कोणत्याही नागरिकाला आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे अथवा वगळण्याकरिता निवडणूक आयोगाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, ही प्रक्रिया सदोष असल्याचे समोर आले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील काही नागरिकांचा नावे वगळण्याशी काही संबंध नाही. जे नागरिक राजकीय दृष्ट्या सक्रीय आहेत शिवाय होऊ घातलेल्या मलकापूरच्या निवडणुकीत जे उमेदवारी करू शकतात, अशा इच्छूक उमेदवारांची नावे वगळण्यासाठी कोणीतरी अज्ञाताने ऑनलाईन अर्ज केले आहेत. याची नोटीस आल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आहे.
ते म्हणाले, मलकापूर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पाचशेहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आले आहेत. तर कराड शहरात हा आकडा सुमारे एक हजारच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह कराड प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात किती नागरिकांची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. याची माहिती मागवली आहे.
अशा पध्दतीने नागरिकांच्या घटनात्मक अधिकारावर गंडांतर आणण्याचा हा प्रकार असून हा खटाटोप राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आ. चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, मतदार यादीत नाव नोंदणी करणे व वगळणे ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने असे बनावट अर्ज कोणत्या संगणकावरून करण्यात आले आहेत, हे तपासणे आता सोपे आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग तसेच पोलीस यंत्रणेने तपास करावा. शिवाय मी स्वत: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे.
माझे नाव वगळले काय?
देशातील मोदी सरकार सर्व स्वायत्त संस्थामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे या प्रकरणावरून पुन्हा सिध्द झाले आहे. आपल्या राजकीय वाटचालीत अडसर ठरणारे मतदार यादीतून हटवण्याचा हा प्रकार आहे. मला ही माझे नाव मतदार आदीत आहे का? हे तपासावे लागेल. कारण माझे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी कुणीतरी अर्ज केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.
बोलवता धनी कोण?
मतदार यादीतून नाव अज्ञातांकडून नावे वगळण्याचा केला प्रयत्न गंभीर आहे. यात मोठे कारस्थान असण्याची दाट शक्ता आहे. आयटी तंत्रज्ञानाचा वापर सत्ता मिळवण्यासाठी करणार असतील तर ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तर हा प्रश्न फक्त कराड पुरता मर्यादीत राहिलेला नसून तो राज्यातील गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे या प्रकरणात अर्ज करणारा गुन्हेगार आहेच मात्र त्याचा बोलवता धनी कोण आहे? याचा तपास करणे आवश्यक असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |