सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या अपघातस्थळाची शुक्रवारी (दि. १३) संयुक्तरीत्या पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाचे विशेष पथक दिल्लीवरून साताऱ्यात दाखल होणार आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभाग यांची आपल्या दालनात बैठक घेतली. यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात असणाऱ्या ‘एस’ आकाराच्या वळणावर दोन दिवसांपूर्वी भीषण अपघातात १८ जण ठार झाले होते. या अपघातानंतर या अपघातस्थळी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याविषयी या बैठकीत ऊहापोह करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तांत्रिक विभागाची टीम दिल्लीवरून साताºयात दाखल होणार आहे. या टीमसोबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. ‘एस’ वळण काढून टाकण्यासारखी मागणी होत आहे.
स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्यासोबतच इतर लोकप्रतिनिधींनी याची सूचना केली आहे. या सूचनाही गांभीर्याने घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. अपघात नेमक्या कोणत्या कारणाने होत आहेत, याचाही तांत्रिक दृष्टीने अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |