कराड : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न अखेर निकालात निघाला आहे. पालिका व हातगाडा संघटनेच्या वतीने निश्चित केलेल्या जागेत 98 हातगाडाधारकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून जागेचे वाटप करण्यात आले. बुधवारी मध्यरात्री 12.30 पर्यंत सोडत सुरू होती. येत्या दोन दिवसांत हॉकर्स झोनच्या जागेत हातगाडा चालक व्यवसाय करण्यास सुरवात करणार असल्याचे हातगाडा संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले.
कराड शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व हातगाडाधारकांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्यात आला आहे. दरम्यान, 26 फेब्रुवारीपासून पालिकेने शहरात धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्याने सर्व हातगाडे बंद ठेवण्यात आले होते. 20 ते 22 दिवस हातगाडे बंद राहिल्याने हातगाडा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने हॉकर्स झोनची निर्मिती करण्याची मागणी हातगाडा संघटनेकडून होत होती.
पालिका व हातगाडा संघटनेच्या माध्यमातून बसस्थानक परिसरातील डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील पुतळयाच्या पाठीमागील जागा, नवग्रह मंदिर परिसर, थाटबाट हॉटेलसमोरील जागा व टाऊन हॉल परिसर या चार जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. या जागेत आखणी करण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरा लकी ड्रॉ च्या माध्यमातून हातगाडा चालकांना जागा वाटप सुरू झाले. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत जागा वाटप सुरू होते. जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, सभापती विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, राहुल खराडे मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता ए. आर. पवार, हातगाडा संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी, आनंदराव लादे, उपाध्यक्ष सतीश तावरे, सचिव हरीभाऊ बल्लाळ, गजाभाऊ कुंभार अधिकारी, कर्मचारी व हातगाडाधारक उपस्थित होते.
गोरगरिबांच्या रोजीरोटीसाठी
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यापासून गोरगरीब हॉकर्सचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे पालिकेने निर्णय घेतला. यात पंधरा दिवसांचा कालावधी गेला. पालिकेने शिक्कामोर्तब केल्यानंतरही हातगाडा संघटनेत जागेबाबत एकमत होत नव्हते. त्यात तीन दिवस गेले. काल रात्री आठपासून हॉकर्स पालिकेत होते. रात्री अंतिम निर्णय झाल्यानंतर सोडत घ्यायचीच, असा निर्णय राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला. यासाठी मध्यरात्री दीडपर्यंत पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, यादव, वाटेगावकर, कांबळे हे नगरसेवक पालिकेत थांबून होते. त्यांना हॉकर्सनी मनापासून धन्यवाद दिले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |